For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसोटी क्रिकेट खडतर, यशासाठी लागेल एकमेकांची गरज : द्रविड

06:53 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कसोटी क्रिकेट खडतर  यशासाठी लागेल एकमेकांची गरज   द्रविड
Advertisement

वृत्तसंस्था/ धर्मशाला

Advertisement

भारताने इंग्लंडवर 4-1 असा संस्मरणीय मालिका विजय मिळविल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये प्रेरक भाषण देताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटच्या खडतर जगात विजय मिळवण्यासाठी एकजूट राखण्याचे आणि एक संघ म्हणून प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

हैदराबादमधील सुऊवातीची कसोटी गमावल्यानंतर यजमानांनी मालिकेवर दावा करताना आश्चर्यकारक पद्धतीने पुनरागमन केले आणि विजयाचा धडाका लावत पुढचे चार सामने जिंकले. ‘अशा मालिकेत विजय हा प्रयत्नपूर्वक कमवावा लागतो आणि हे खडतर असते. कसोटी क्रिकेट कधी कधी कठीण असते. कौशल्याच्या दृष्टीने, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही ते कठीण असते’, असे द्रविडने ‘बीसीसीआय टीव्ही’वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Advertisement

पण शेवटी खूप समाधान मिळालेले आहे. एक सामना हरून पिछाडीवर पडल्यानंतर चार सामने जिंकून मालिका जिंकता येणे हे खूप समाधान देणारे ओ. मला वाटते की, हे निव्वळ अभूतपूर्व आहे, असे द्रविडने म्हटले आहे. विराट कोहली आणि मोहम्मद शमी तसेच फक्त सलामीचा सामना खेळलेला के. एल. राहुल यासारखे प्रमुख खेळाड अनुपलब्ध असतानाही भारताने हे यश मिळविलेले असून त्यात भारताला काही तरुण खेळाडूही गवसलेले आहेत. रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान आणि आकाश दीप या पाच खेळाडूंना या महत्त्वपूर्ण मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक कसोटी गमावली.

या मालिकेतून काही तरुण नावे उदयास आल्याने भारतीय प्रशिक्षकांना सुखद धक्का बसलेला आहे. तरुण खेळार्डूना, विशेषत: या गटात आल्यानंतर यशस्वी होण्यासाठी एकमेकांची आवश्यकता भासेल. तुम्ही फलंदाज किंवा गोलंदाज किंवा काहीही असलात, तरी तुमचे यश इतर खेळाडूंच्या यशाशी जोडलेले असते. तुम्ही सर्व जण एकमेकांच्या यशात गुंतलेले आहात. आणि पुढे जाणे हे महत्त्वाचे आहे. हे तुमच्या यशाबद्दल नाही, तर तुम्ही इतरांना यशस्वी होण्यासाठी कशी मदत करू शकता याबद्दल आहे. ते तुम्हाला यशस्वी होण्यास देखील मदत करेल, असे द्रविडने त्यात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.