‘टेस्ला’चा भारतातील नवा प्रवास सुरु
पहिल्या शोरुमचे मुंबईत लोकार्पण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
मुंबई :
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाचे पहिले शोरूम मंगळवार 15 जुलै रोजी भारतात शानदार समारंभाने सुरु झाले. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचा भारतातला नवा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टेस्ला शोरूमच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी टेस्लाची पहिली कार लाँच केली.
सदरची शोरुम लोकांसाठी अनुभव केंद्र म्हणून काम करेल. म्हणजेच येथे केवळ कार विकल्या जाणार नाहीत तर लोकांना टेस्लाचे तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यो देखील जवळून पाहता येणार आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व कंपनीचे अधिकारी आणि विशेष पाहुणे तसेच माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होते. त्यानंतर लवकरच, शोरूम सामान्य लोकांसाठी देखील उघडली जाईल असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंतचे सर्वात मोठे उत्पादन : मस्क
टेस्लाने त्यांच्या ह्युमनॉइड रोबोट ‘ऑप्टिमस’ च्या नवीनतम आवृत्तीचे अनावरण केले आहे. आता हा रोबोट तुमच्या घरात जवळजवळ सर्व दैनंदिन कामे करण्यास सक्षम आहे. आताही तो स्वयंपाक करू शकतो आणि घर स्वच्छ करू शकतो. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रोबोटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दररोजची घरातील कामे सहजतेने करत आहे.
पहिली कार लाँच
मॉडेल वायचे दोन प्रकार सादर करण्यात आले असून पूर्ण चार्जवर कार 500 किमी आणि 622 किमीचे मायलेज देणार आहे. गाडीची किंमत 60 लाखांपासून सुरू होते.
एलॉन मस्कची ईव्ही कंपनी टेस्लाने भारतात पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल वाय लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 622 किलोमीटरपर्यंत धावू शकते. सुरक्षिततेसाठी कारमध्ये 8 एअरबॅग्जसह लेव्हल-2 इडीएएस सारखी वैशिष्ट्यो आहेत.
भारतात इलेक्ट्रिक कार दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - रियर व्हील ड्राइव्ह आणि लॉन्ग रेंज रियर व्हील ड्राइव्ह त्याच्या व्हेरिएंटची किंमत 60 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याच वेळी, लाँग रेंज व्हेरिएंटची किंमत 68 लाख रुपये आहे. तर, जागतिक बाजारात ही कार ऑल व्हील ड्राइव्ह पर्यायासह देखील येते. कारच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे.
आणखी दोन प्रकल्पांवर काम सुरु
स्टीअरिंग आणि पेडलशिवाय ‘सायबरकॅब’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅलिफोर्निया, अमेरिकेत झालेल्या ‘व्ही-रोबोट’ कार्यक्रमात टेस्लाच्या सीईओने एआय वैशिष्ट्यांसह त्यांच्या पहिल्या रोबोटॅक्सी ‘सायबरकॅब’ च्या संकल्पना मॉडेलचे अनावरण केले आहे. परंतु ते काम पूर्ण करण्यासाठी काम सुरु असल्याची माहिती आहे.
फिचर्सची वैशिष्ट्यो...
? सिंगल, क्रॉस-कार लॅम्प जगातील पहिला अप्रत्यक्ष रिफ्लेक्टिव्ह टेललाइट यात आहे.
? अॅम्बियंट इंटीरियर लाइटिंग, रिफाइंड मटेरियल आणि व्हेंटिलेटेड फर्स्ट-रो सीट्स
? पॉवर फोल्डिंग सेकंड-रो सीट्स : मागील बाजूस 8-इंच ब्लूटूथ-सुसंगत टचक्रीन सर्वत्र अकॉस्टिक ग्लासमुळे शांत केबिन