महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुढील वर्षी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री; महाराष्ट्र किंवा गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्याची शक्यता

06:40 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र किंवा गुजरातमध्ये वाहन उद्योग प्रकल्प उभारण्याची तयारी : 20 लाखांच्या गाड्या बनवणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ईलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) हे नजिकच्या काळातील वाहन उद्योगाचे भविष्य असणार आहे. त्यादृष्टीने एलॉन मस्क यांनी आपली कंपनी टेस्ला भारतात लॉन्च करण्याचा रोडमॅप तयार केला आहे. टेस्लाने पुढील वषी आपल्या संभाव्य भारत भेटीपूर्वी तयारीला अंतिम रूप देण्यास सुऊवात केली आहे. टेस्ला इंडियाचा कारखाना गुजरात किंवा महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्मयता आहे. येथून दरवषी 5 लाख ईव्ही कार तयार होऊ शकतात. टेस्ला इंडियाच्या एन्ट्री लेव्हल कारची किंमत सुमारे 20 लाख ऊपये असू शकते.

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच टेस्लाच्या पॅलिफोर्नियातील उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. याप्रसंगी टेस्लासोबत आयात शुल्क कमी करण्याबाबत करार झाला. आयात शुल्कात कपात करण्याबाबत केंद्र सरकारने टेस्लाशी सहमती दर्शवली आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पुढील वषी जानेवारीमध्ये मस्क यांच्या संभाव्य भारत भेटीदरम्यान टेस्ला इंडियाबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

भारताला ईव्ही कार निर्यात बेस बनवण्याची योजना

2030 पर्यंत जगभरात 2 कोटी ईव्ही कारविक्री करण्याचे मस्क यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांना भारताला आशिया आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी निर्यातीचा आधार बनवायचा आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये चीननिर्मित ईव्हीशी स्पर्धा करण्यासाठी मस्क यांना भारतात ईव्ही कारखाना सुरू करायचा आहे. भारताच्या देशांतर्गत ईव्ही मार्केटवरही मस्क यांचा डोळा आहे.

टेस्ला कंपनीने भारताचाही पुरवठा साखळीत समावेश केला आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे. गेल्या वषीपर्यंत टेस्लाने भारताकडून सुमारे 8,300 कोटी ऊपयांचे भाग मागवले होते, असे पॅलिफोर्नियातील टेस्लाच्या उत्पादन प्रकल्पाच्या भेटीदरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले. या वर्षाच्या अखेरीस टेस्ला आपल्या ईव्ही कारसाठी 16.6 हजार कोटी ऊपयांचे भाग ऑर्डर करेल. भारतीय विव्रेते 2021 पासून सुटे भाग पाठवत असून टेस्लाला भारतीय घटकांचा दर्जा योग्य वाटत असल्याचे वाढत्या मागणीवरून दिसून येत आहे.

बॅटरी स्टोरेज सिस्टीम ‘पॉवरवॉल’ही बनवणार

मस्क यांची कंपनी टेस्लाने भारतात ‘पॉवरवॉल’ तयार करून विकण्याची योजना आखली आहे. ‘पॉवरवॉल’ ही बॅटरी स्टोरेज सिस्टीम असून ती सोलर पॅनलपासून काम करते. अंदाजे एक मीटर उंचीची ही ‘पॉवरवॉल’ यंत्रणा गॅरेजमध्ये किंवा घराबाहेर ठेवता येते. अमेरिकेतील ह्यूस्टन आणि डॅलसमध्येही लोक ‘पॉवरवॉल’ प्रणालीद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडला विकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलिफोर्नियातील टेस्लाच्या प्रकल्पातील ‘पॉवरवॉल’चे कौतुक केले आहे.

मॉडेल 3 ही टेस्लाची सध्याची सर्वात स्वस्त कार

सध्या टेस्लाच्या चार इलेक्ट्रिक कार अमेरिकन बाजारात विकल्या जात आहेत. यामध्ये मॉडेल एस, मॉडेल 3, मॉडेल एक्स आणि मॉडेल वाय यांचा समावेश आहे. मॉडेल 3 ही यापैकी सर्वात स्वस्त कार आहे. अमेरिकेत त्याची किंमत 32,740 डॉलर्स (सुमारे 26.87 लाख ऊपये) आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 535 किलोमीटर धावते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article