महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवाद्याच्या सहकाऱ्याला एनआयएकडून अटक

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुन्हेगारांना करत होता शस्त्रास्त्रपुरवठा

Advertisement

चंदीगड : एनआयएला खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. एनआयएने घातक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याशी निगडित एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कप्रकरणी खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंह संधू उर्फ लांडाच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव बलजीत सिंह उर्फ राणा भाई उर्फ बल्ली असल्याची माहिती एनआयएने शुक्रवारी दिली आहे. बलजीत सिंह हा मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्याचा रहिवासी आहे. पंजाबमधून त्याला अटक करण्यात आली आहे. बलजीत सिंह हा पंजाबमध्ये लांडाच्या हस्तकांना शस्त्रास्त्र पुरवठा करत होता. बलजीतकडून पुरविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आला होता. तसेच शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत व्यापारी आणि अन्य लोकांकडून खंडणी वसूल करण्यात आली होती. याचबरोबर एनआयएने गुरप्रीत सिंह गोपी या आरोपीलाही अटक केली आहे. तो लखबीर सिंह लांडा आणि दहशतवादी सतनाम सिंह सत्ताचा हस्तक होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article