महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवाद्यांचा तळ काश्मीरमध्ये उद्ध्वस्त

06:35 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरक्षा दलाच्या कारवाईत शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त, चिनी-पाकिस्तानी ग्रेनेडसह एके-47 मॅगझिनचाही समावेश

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील सरनियाल जंगलात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. तेथे शोध पथकाला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला. लष्कराने जंगलातून तीन चिनी ग्रेनेड, एका पाकिस्तानी ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. याशिवाय एके-47 मॅगझीनही सापडले. लष्कराने शुक्रवारीच बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन भूमिगत कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे.

लष्कराने जप्त केलेल्या स्फोटक साहित्यात 7.62 एमएमची 113 काडतुसे, एके 47 ची 3 मॅगझिन, 7.62 एमएमची 7 स्निपर काडतुसे, 9 एमएमची 2 काडतुसे, 3 चायनीज ग्रेनेड, 1 पाकिस्तानी ग्रेनेड, 2 डिटोनेटर, 2 फ्यूज, एफएम ग्रेनेड (एफएमआरएपीआय) आणि 300 ग्रॅम स्फोटक सामग्री आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमक एका दिवसापूर्वीच संपली. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या गोळीबारात पाच लष्करी अधिकारी-जवान हुतात्मा झाले होते. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठा फटका बसल्यानंतर दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article