महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

06:45 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस कॉन्स्टेबल जखमी : प्रकृती चिंताजनक

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

श्रीनगरमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कॉन्स्टेबल जखमी झाला. श्रीनगरच्या बाहेरील हमदानिया कॉलनीत दहशतवाद्यांनी एका पोलिसाला लक्ष्य केले. या गोळीबारानंतर कॉन्स्टेबलला गंभीर अवस्थेत ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाफिज अहमद असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील हमदानिया कॉलनी येथील रहिवासी आहे.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच हल्लेखोरांच्या अटकेसाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत हल्लेखोर सापडले नव्हते. यापूर्वी गेल्या महिन्यात 22 नोव्हेंबर रोजी श्रीनगरमध्ये दोन जणांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली होती. पोलिसांनी बेमिना परिसरात तपासणीदरम्यान कुपवाडा जिह्यातील दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून आठ ग्रेनेड आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली होती.

काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने अलीकडेच, 5 डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी बैठक घेतली होती. ज्यात एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था विजय कुमार यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा ग्रिडच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीत श्रीनगर जिह्याच्या सविस्तर सुरक्षा आराखड्यावर चर्चा करण्याबरोबरच सीआरपीएफ आणि पोलिसांना त्यांच्या नवीन भूमिकांबद्दल माहिती देण्यात आली. या बैठकीत दहशतवादविरोधी ग्रीड मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सूचनाही मागविण्यात आल्या होत्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article