For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादी अकबर पाशाची हिंडलगा कारागृहात रवानगी

12:23 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादी अकबर पाशाची हिंडलगा कारागृहात रवानगी
Advertisement

नागपूर पोलिसांनी विमानाने आणले

Advertisement

बेळगाव : दहशतवाद्यांबरोबर संबंध असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकी देऊन कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितलेला कैदी अकबर पाशा याला नागपूर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात आणले. नागपूर येथून विमानाने आणून चोख पोलीस बंदोबस्तात त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दहशतवादी अकबर पाशा याला नागपूर येथून विमानातून बेळगाव सांबरा विमानतळावर आणण्यात आले. पाशा याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या जयेश पुजारी याच्याकडूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहात धमकी देण्यात आली होती. 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अकबर पाशा आणि जयेश पुजारी यांना ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांनी कसून चौकशी केली होती. काही दिवसापूर्वी जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांकडून हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती. तर दहशतवादी अकबर पाशा याला नागपूर केंद्र कारागृहातून विमानाद्वारे बेळगावला आणण्यात आले. सोमवारी रात्री त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामुळे हिंडलगा कारागृहात गंभीर स्वरुपातील गुन्ह्यांच्या प्रकरणातील कैद्यांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.