महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात दहशतवादी अदनानची हत्या

06:43 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या : बीएसएफ जवानांवरील हल्ल्याचा होता सूत्रधार

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तानच्या कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा आणखी एक दहशतवादी हंजला अदनानची हत्या झाली आहे. हंजलावर 2-3 डिसेंबरच्या रात्री हल्ला झाला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने अत्यंत गुप्तता बाळगून हंजलाला रुग्णालयात हलविले होते, जेथे त्याचा 5 डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले.

2015 मध्ये जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफ ताफ्यावरील हल्ल्याचा अदनान हा सूत्रधार होता. या हल्ल्यात 2 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते तर 13 जण जखमी झाले होते. याचबरोबर हंजलाने 2016 मध्ये पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावरही हल्ला करविला होता, ज्यात 8 जवान हुतात्मा झाले होते.

पीओकेत दहशतवाद्यांना प्रशिक्षण

पुलवामा हल्ला घडवून आणण्यातही हंजलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा अदनान हा निकटवर्तीय होता. हंजलाकडे पीओकेतील लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पमध्ये नव्या भरती झालेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. यातील बहुतांश दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित केले जात होते. अदनानला लष्कर-ए-तोयबाचा कम्युनिकेशन एक्सपर्ट देखील म्हटले जाते.

3 महिन्यात 12 हून अधिक दहशतवादी ठार

पाकिस्तानात मागील 3 महिन्यांमध्ये 12 हून अधिक दहशतवाद्यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत सामील असलेले हे दहशतवादी होते. परंतु आतापर्यंत पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटनांनी याप्रकरणी मौन बाळगले आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article