दहशत धमक्यांची!
जगात देशाची सर्व क्षेत्रात प्रगती सुऊ आहे. अशावेळी देशात अंधाधुंद परिस्थिती निर्माण करण्यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. यासाठी त्यांचे प्रमुख लक्ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील हवाई यंत्रणा आहे. आत्तापर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीवर सागरी मार्गाने हल्ले झाले आहेत. यामुळे येथुन पुढील हल्ला हा हवाई मार्गाने होऊ शकतो असा इशारा तपास यंत्रणांनी यापूर्वी दिला आहे. त्यानुसार, याची चाचपणी देखील काही समाजकंटक अथवा घातकी संघटनांनी सुऊ केली असून यासाठी त्यांनी धमक्यांची दहशत निर्माण करण्यास सुऊवात केली आहे.
देशातील आर्थिक, राजकीय आणी सामाजिक सलोखा बिघडवायचा असेल तर त्या देशाच्या मुळावर वार करायचा. जेणेकऊन देशाची सर्व व्यवस्था कोलमडून पडते. अशावेळी आपल्याला जे हवे आहे ते शक्य कऊन घ्यायचे. ही मोडस ऑपरेंडी असते दहशतवादी संघटनांची. केवळ दहशतवादी संघटनाच या मोडस ऑपरेंडीचा वापर करीत नाहीत. तर देशातीलच अनेक समाजकंटक देशाबरोबर गद्दारी करीत आपले इप्सीत या मार्गाने साध्य करतात. यावेळी अनेकदा मोड्स ऑपरेंडी वापरण्यात येते ती धमक्यांची. वेगवेगळ्या पद्धतीने धमकावत देशात धमक्यांची दहशत निर्माण करण्याचे काम या संघटनांनी आणि समाजकंटकांनी सुऊ केले आहे.
गेल्या वर्षभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहावेळा धमकाविल्याचे समोर आले आहे. मोदी यांना सातत्याने जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. जेणेकऊन देशाच्या तपास यंत्रणा किती सतर्क आहेत, याची देखील एकप्रकारे चाचपणी केली जाते. तर दुसरीकडे या धमक्या म्हणजे अफवा असल्याचे देखील अनेकदा समोर आले आहे. मात्र कोणत्याही धमक्यांना मुंबई पोलीस अथवा देशातील तपास यंत्रणांनी सहजतेने घेतले नाही. कारण एखाद्या धमकीला सहजतेने घेतल्याचे परिणाम अद्याप देश भोगत आहे. यामुळे सध्या धमक्यांनी कितीही दहशत घालण्याचा प्रयत्न केला तरी तपास यंत्रणा चौकस आहेत.
केवळ पंतप्रधान मोदी यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली जात नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील जीवे मारण्याची धमकी दिली जात असते. या सर्व धमक्या मुंबई पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण कक्षाच्या फोनवर सध्या येत आहेत. या अशा धमक्या दिल्याने, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा मानस समाजकंटकांचा असतो. मात्र या सर्व धमक्यांना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे पुऊन उरले आहेत. केवळ अशाच प्रकारच्या धमक्या देऊन समाजकंटक अथवा काही संघटना थांबल्या नाहीत. तर सातत्याने विमान कंपन्यांनादेखील धमकीचे सत्र सुऊ झाले आहे. मुंबई शहरावर हवाई हल्याचा इशारा हा गेली कित्येक वर्षे आहे. यामुळे मुंबईतील हवाई यंत्रणा आणि मुंबई पोलीस किती सतर्क आहेत याची देखील चाचपणी विमान कंपन्यांना धमक्या देत होत असण्याची शक्यता आहे. कारण मुंबईवर आत्तापर्यंत सागरी मार्गाने हल्ले झाले आहेत. मग ते 12 मार्च 1993 सालचे साखळी बॉम्बस्फोट असोत की, 26/11 हल्यातील दहशतवाद्यांची सागरी मार्गाने घुसखोरी असो. यामुळे येणारा हल्ला हा हवाई मार्गाने तोही पॅराशुट अथवा अमेरीकेच्या 9/11 हल्यासारखा असू शकतो असा इशारा यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे या हल्यांना तोंड देण्यासाठी मुंबई पोलीस किती सतर्क आहेत, याची चाचपणीदेखील हे समाजकंटक अथवा संघटना करीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यापासून देशभरात विमानांना धमक्या देण्याची अनेक प्रकरणं घडली आहेत. त्यामुळे शंभरहून अधिक विमानाच्या उ•ाणावर परिणाम झाला होता. काही किरकोळ धमक्या वगळता, आयपी अॅड्रेसनुसार, अनेक मेसेज युरोपातून आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असून त्यामागे काही घातकी संघटना असण्याचा संशय आहे मात्र याबाबत ठोस माहिती तपास यंत्रणांकडे उपलब्ध नाही. यापूर्वी विस्तारा एअरलाईनसह आणखी 3 विमान कंपनीच्या एक्स(ट्वीटर) हॅन्डलवर विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश पाठवणाऱ्या विरोधात सहार पोलिसांनी दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल केले आहेत. विमानात बॉम्बच्या धमकीचे मुंबईत आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. 2008ब्लूमिंग या एक्स खात्यावरून हा धमकीचा संदेश आला होता.
गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचे संदेश येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 13 गुन्हे दाखल केले असून त्यात विमानात बॉम्ब असल्याचे मेसेज अथवा ईमेल करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे सत्र सुरू असून सर्व विमानांमधील प्रवाशांची आणि सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आवश्यक तपासणीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तपास यंत्रणा किती सतर्क आहेत, याची तर ही चाचपणी नाही ना असा देखील संशय व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील विविध एअरलाइन्सवर बॉम्बची माहिती मिळाली होती. त्यात यूके 106 (सिंगापूर ते मुंबई) आणि यूके 107 (मुंबई ते सिंगापूर) यासह विस्तारा एअरलाइन्सला त्यांच्या सहा फ्लाइटसाठी धमक्या मिळाल्या. अकासा एअरला देखील क्यूपी 102 (अहमदाबाद ते मुंबई), क्यूपी 1385 (मुंबई ते बागडोगरा), क्यूपी 1519 (कोची ते मुंबई) आणि क्यूपी 1526 (लखनौ ते मुंबई) यासह अनेक विमानांबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. इंडिगो एअरलाइन्सने 6 ई 58 (जेद्दा ते मुंबई) आणि 6 ई 17 (मुंबई ते इस्तंबूल) सह सहा विमानांवर सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. प्रत्येक विमानांची आणि प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. तर गेल्या काही दिवसांपूर्वी एकाच दिवसात 85 नवीन धमक्या आल्या होत्या. त्यापूर्वी देशभरात 190 धमक्यांचे संदेश प्राप्त झाले होते. तत्पूर्वी ऑक्टोबरच्या 15 दिवसांतच 70 हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले आहेत. आयपी अॅड्रेसनुसार काही संदेश लंडन, जर्मनी आणि फ्रान्स येथील असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
अशावेळी तपास यंत्रणांनी याचा तपास केला असता आरोपी त्यासाठी व्हीपीएन सुविधेचा वापर करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. तसेच ही मोड्स ऑपरेंडी इल्युमिनिटी हॅकर्स ग्रुपशी साधर्म्य असल्याचे समोर आले. इल्युमिनिटी हॅकर्स ग्रुप हा युरोपातील अनेक देशात सक्रीय आहे. ही कार्यपद्धती त्यांची वाटत असून ते भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. जेणेकऊन भीती आणि धमक्यांची दहशत निर्माण करीत वेगळे इप्सीत साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. मात्र या सर्वांना आपल्या तपास यंत्रणा पुऊन उरल्या आहेत.
- अमोल राऊत