कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विचित्र टेडी बिअरमुळे दहशत

06:55 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लुबुबु डॉलनंतर आता मानवी त्वचेने निर्मित टेडी बिअर चर्चेत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एका अशा टेडी बिअरमुळे दहशत फैलावली आहे आणि पोलिसांनी आता मानवी त्वचेचा वापर टेडी बियर निर्मितीसाठी करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे. कॅलिफोर्नियात एका इसमाकडे विचित्र टेडी बिअर मिळाला, हा मानवी त्वचेपासून निर्माण करण्यात आल्याचे वाटत होते. तर हा टेडी बिअर एका दुकानानजीक पडलेला मिळाला असल्याचा संबंधित इसमाने दावा केला. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

Advertisement

13 जुलै रोजी विक्टरविलेमध्ये मानवी अवशेष मिळाल्याची माहिती समोर आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी यानंतर अजब दिसणारा टेडी बिअर ताब्यात घेत तपासणीसाठी पाठविला होता. याप्रकरणी 23 वर्षीय हेक्टर कोरोना विलानुएवाला अटक करण्यात आली. टेडीच्या तपासणीनंतर शेरिफ कार्यालयाने हा कुठल्याही मानवी अवशेषाद्वारे तयार करण्यात आला नव्हता असे स्पष्ट केले. पोलिसांनी याला खोडसाळपणा ठरवत मानवी अवशेष मिळाल्याचा दावा करणाऱ्या विलानुएवाला अटक केली.

Advertisement

दिली चुकीची माहिती

विलानुएवाला टेडी बिअरमध्ये मानवी त्वचेचा वापर झाला नसल्याचे माहित होते, तरीही त्याने जाणूनबुजून खोटी माहित दिली होती. याचमुळे खोटे पुरावे सादर केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. फ्रँकनस्टाइन राक्षसाप्रमाणे दिसणारा दक्षिण कॅरोलिनाचा एक कलाकार रॉबर्ट कॅली स्वत:च्या दुकानावर अशाप्रकारचा टेडी बिअर 165 डॉलर्समध्ये विकत आहे. ही खेळणी मानवी त्वचेने शिवलेल्या एका फ्रँकनस्टाइन राक्षसाप्रमाणे वाटते आणि यात रक्त फासल्याचे वाटते.

लेटेक्सने निमिर्ती

याप्रकरणी तपासणीत मानवी त्वचेचा दावा असलेल्या टेडी बिअरची निर्मिती प्रत्यक्षात लेटेक्सद्वारे करण्यात आली होती. याचे निर्माते रॉबर्ट केली यांना टीकाकारांनी ‘सैतानवादी’ ठरविले आहे. अजब दिसत असल्यानेच केली यांना या टेडी बिअरच्या ऑर्डर्समध्ये मोठी वृद्धी आढळून आली. आमच्या कलेत रुची बाळगणाऱ्या लोकांशी भेटणे चांगले वाटते. कधीकधी आम्हाला धार्मिक कट्टरवादी आणि संशयी लोक भेटतात, जे या कलाकृतीवर टीका करत असतात असे रॉबर्ट यांनी सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article