For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्पमध्ये तरुणाचा भीषण खून

10:16 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्पमध्ये तरुणाचा भीषण खून
Advertisement

क्षुल्लक कारणातून डोक्यात घातला दांडका, परिसरात दहशतीचे वातावरण

Advertisement

बेळगाव : आपल्या घरात झोपलेल्या तरुणाचा क्षुल्लक कारणावरून भीषण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी भरदुपारी तेलगू कॉलनी, कॅम्प येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. कॅम्प येथील दोघा तरुणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गणेश प्रकाश कांबळे (वय 29) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुलेमान तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. गणेशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. उपलब्ध माहितीवरून गणेश आपल्या घरी झोपला होता. त्यावेळी कॅम्प येथील दोन तरुण त्याच्या घरात शिरले. सुरुवातीला गणेशचे चुलते आडवे आले. त्यांना ढकलून झोपलेल्या गणेशवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. खुनानंतर पलायन करताना एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गणेश हा लाकूड अ•dयावर काम करीत होता. त्याचे लग्न ठरविण्यासाठी स्थळ बघण्याचे कामही सुरू होते. होळीनंतर मंगलकार्य ठरविण्यात येणार होते. त्याआधीच कॅम्प येथील दोन तरुणांनी त्याचा खून केला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला? याची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

नवी गुन्हेगारी टोळी...

कॅम्प येथील पेट्रोलपंपासमोर 15 ऑक्टोबर 2023 रोजी अरिकस्वामी अँथोनी (वय 25) या तरुणाचा खून करण्यात आला होता. ठीक पाच महिन्यांनी तेलगू कॉलनी येथे आणखी एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. अरिकस्वामीच्या खून प्रकरणात सहभागी असलेल्या एका संशयिताचाच या खुनामध्येही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. कॅम्पमधील शांत परिसराला सुरुंग लावण्यासाठी नवे गुन्हेगार उदयास आले असून पाच महिन्यांत दोन तरुणांचा मुडदा पाडला आहे.

Advertisement
Tags :

.