Miraj : मिरजेत महामार्गावर भीषण अपघात, तरुण जागीच ठार
सुभाषनगरजवळ महामार्गाशेजारी भीषण अपघात
मिरज : सुभाषनगर येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजखाली चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार तर एकजण जखमी झाला.
इर्शाद रियाज मगदूम (वय ३४, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नांव आहे. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन संशयीत चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सुभाषनगर रस्त्यावरील रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या ब्रिजखालून रविवारी दुपारी इर्शाद मगदूम व त्याचा मित्र आयराप शोकत देसाई असे दोघेजण दुचाकी (एमएच १०-बीसी-२७३२) वरुन जात होते. यावेळी कोंबड्या वाहतूक करणारा पिकप टेंपो सुभाषनगरकडून म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन भरधाव वेगात आला.
सदर टेंपोची इर्शाद मगदूम यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. ही ध डक इतकी भीषण होती, दुचाकीचा चक्काचूर होऊन दुचाकीवरील इर्शाद मगदूम व त्याचा मित्र आयराप शोकत देसाई असे दोघेजण रस्त्यावरुन फरफटत गेले. गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने इर्शाद याचा जागीच मृत्यू झाला. तर आयराप इनामदार हाही तरुण गंभीर जखमी झाला.
अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती. अपघातस्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला. संशयित चारचाकी चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.