Solapur News : टेंभुर्णीत भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
करमाळा चौकात सिमेंट मिक्सरचा कहर; दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी अंत
टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात रस्त्यावरील अतिक्रमणे व बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्व सामान्यांना सतत बसत आहे. याचा नुकताच प्रत्यय आला आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करमाळा चौकात भरदिवसा भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने मागून दुचाकीस धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
यामध्ये दुचाकीवरील महिलेच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांचा पाय चेंदामेंदा झाला. तसेच त्या खाली रोडवर जोरात आदळल्या. यामुळे गंभीर जखमी झाल्याने उपचारास घेऊन जात असताना ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.त्यांचे पडल्याने किरकोळ जखमी झाले. पती बाजूलानाव आहे. लंकाबाई ज्ञानदेव गदादे (वय ५७) असे मृत महिलेचे ज्ञानदेव गदादे (वय ६०, दोघे रा. बिजवडी रोड, इंदापूर) असे जखमी पतीचे नाव आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताने सर्वजण हादरून गेले.
ज्ञानदेव गदादे व त्यांच्या पत्नी लंकाबाई हे त्यांच्याकडील यामाहा दुचाकीवरून (एमएच ४२-आर ८००७) पत्नीच्या नातेवाईकांना (भाचीस) भेटण्यासाठी तालुक्यातील वेणेगाव येथे गेले होते. नंतर टेंभुर्णी येथील कुटे वस्तीवरील माढा लंकाबाई यांच्या बहिणीस भेटून आले होते. मंगळवारी सायंकाळी ते पाचच्या सुमारास करमाळा चौकात आले असता मागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने भरधाव वेगात दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये लंकाबाई गदादे यांच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तसेच रोडवर आढळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना अकलूज येथे उपचारास घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
टेंभुर्णी शहर हे अनेक महामार्गानी जोडलेले गाव असल्याने या शहरात दुचाकी, चारचाकी, मालट्रक, कंटेनर,सिमेंट बल्कर, अवजड वाहने, शाळेची वाहने, ऊस वाहतुकीची वाहने यांची सतत वर्दळ असते. अत्यंत बेफिकीरीने काहीजण वाहने चालवितात याकडे कुणीही लक्ष देत नाही. अनेक वाहने उलट दिशेने ये-जा करतात. तसेच रस्त्यावर अतिक्रमण केलेली दुकाने, थांबलेली वाहने यामुळे नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, वृद्ध यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. चौकात गतिरोधक नाहीत. वाहतूक पोलीस कर्मचारी नसतात. याबाबत वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तसेच सुसाट वाहनांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.