Karad News : देवदर्शनावरून परतताना शेनवडी येथे भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू !
शेनवडी फाटा येथे दुचाकीला बेलोरो गाडीची भीषण धडक
कराड : कराड–पंढरपूर महामार्गावर माण तालुक्यातील शेनवडी फाटा येथे रविवारी रात्री दुचाकीला बेलोरो गाडीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या धडकेत शहाजी तातू शिंदे (वय 65, रा. शेंडगेवाडी, बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली यांचा जागीच मृत्यू झाला असून दादा तुळशीराम व्हटकर, हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही शेनवडी (ता. माण) येथील श्री म्हस्कोबा देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले होते.
या घटनेमुळे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.