महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टर्मिनेटर स्टाइलचे रोबोट सैन्यात होणार सामील

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रागात ओरडणार, सहकारी सैनिकांसोबत संभाषण करणार

Advertisement

जगात अनेक देश स्वत:च्या सैन्यात रोबोट्सना सामील करण्याचा विचार करत आहे. युद्धात मानव सैनिकांना रोबोट सैनिक साथ देऊ शकतील आणि युद्धात विजयी होण्यास मदत करू शकतील का यावर सखोल संशोधन केले जात आहे. यात चीनसारखे देशही सामील आहेत. परंतु अलिकडेच ब्रिटनने या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटन स्वत:च्या सैन्यात प्रसिद्ध हॉलिवूडपट टर्मिनेटरमध्ये दाखविण्यात आलेल्या रोबोटप्रमाणे नवे रोबोट्स सैन्यात सामील करत आहे. सैन्य प्रमुख टर्मिनेटर शैलीच्या रोबोटचे अनावरण करणार आहेत. हा रोबोट सैनिकांसोबत संभाषण करू शकतो. एआय प्रोग्राम चॅटजीपीटीने युक्त आणि युद्धभूमीत प्रशिक्षण सत्रांदरम्यान हा रोबोट सैनिकांशी बोलू शकेल आणि त्यांच्यासमोर व्यक्त होऊ शकेल.

Advertisement

सिमस्ट्राइकर नावाचे यंत्र कुठल्याही व्यक्तीचे शब्द किंवा कृत्यांवर प्रतिक्रिया देतो. अशा रोबोटला स्थितीला नियंत्रण मिळविता येते. तसेच जर एखादा सैनिक संतापात असेल तर हा रोबोट संतापू शकतो. प्रशिक्षणात सैनिकांना ‘उत्तम’ करण्यासाठी साइबॉर्गचा वापर करण्याची इच्छा असल्याचे याच्या निर्मात्यांनी म्हटले आहे. हा रोबोट टर्मिनेटरची छाप पाडतो. चित्रपटाच्या उलट आम्ही सैनिकांना रोबोटच्या अधीन करण्याचा प्रयत्न करत नसल्याचे 4जीडी फर्मचे जेम्स क्राउले यांनी म्हटले आहे. सैनिकांना सर्वोत्कृष्ट करण्यासाठी आम्ही रोबोटचा वापर करू इच्छितो. आम्ही याचा वापर प्रशिक्षण संचालनासाठी करू इच्छित आहोत. हा रोबोट ओरडू शकतो आणि प्रत्युत्तरादाखल फायरही करू शकतो असे क्राउले यांनी सागितले. सिमस्ट्राइकर प्रकल्पाचा प्रयोग कोलचेस्टर एसेक्स येथील 16 एअर असॉल्ट ब्रिगेडचे कर्मचारी करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article