तेरवण -मेढे रस्ता रखडला ; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
तेरवण -मेढे ग्रामस्थांचा इशारा
दोडामार्ग - वार्ताहर
तेरवण मेढे येथील रखडलेल्या रस्त्याचे काम काम सुरू न झाल्यास २६ ऑगस्ट रोजी याच रस्त्यावर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांनी एक प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात पुढे म्हटले आहे, तेरवण मेढे रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून गेली पाच वर्षे तो अर्धवट स्थितीत आहे. या ६ किमी रस्त्यासाठी ग्रामस्थ मागील ५ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. राज्यात युतीचे सरकार १० वर्षांपासून आहे. येथील स्थानिक आमदार दिपक केसरकर हे मंत्री आहेत. रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नारायण राणे खासदार आहेत. जिल्ह्याचे इतके मातब्बर नेतेमंडळी असूनसुद्धा या रस्त्याप्रश्नी कार्यवाही होत नाही. या मंत्री महोदयांनी तात्काळ यात लक्ष घालून वर्क ऑर्डर द्यावी. अन्यथा २६ ऑगस्ट रोजी या रस्त्यावरच उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.