राज्यासह जिल्ह्यात हुडहुडी वाढणार
कोल्हापूर :
उतर भारतातून येणारे बोचरे वारे व हिमालयामध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी, यामुळे राज्यासह जिल्ह्यामध्ये थंडी वाढत चालली आहे. पुढील काही दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर शहरामध्ये शनिवारी कमाल 28 तर किमान 16 सेल्सीअस अंशाचे वातावरण होते. तसेच पावसाचे चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या थंडीमुळे स्वेटर, रग व रुम हिटरची खरेदी सुरू आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी थंडी वाढत चालली आहे. सकाळी धुके तर रात्रीनंतर थंडी सुरू होते. कोल्हापूर शहरामध्ये शनिवारी कमाल 28 तर किमान 16 सेल्सीअस अंशाचे वातावरण होते. येत्या दोन दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पावसाचे चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे. थंडीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून रुग्णालयामध्ये गर्दी झालेली दिसत आहे. तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
वाढत्या थंडीमुळे दसरा चौक येथील स्वेटर स्टॉल्सवर खरेदीला गर्दी झालेली दिसत आहे. विशेषत: लहान मुलासाठी स्वेटर पायमोजे, हातमोजे टोपी खरेदीसाठी गर्दी झालेली दिसत आहे. तर महिलांसाठी स्वेटर तर पुरुषांसाठी जॅकेटची खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर सिंगल व डबल रगची विक्री रोडवर सुरू आहे. उच्चवर्गीयांच्या बंगल्यामध्ये रुम हिटरचा वापर होताना दिसत असून विक्री-दुरुस्ती वाढली आहे.