जिल्हाधिकारी लोकशाही दिनात 88 अर्ज
कोल्हापूर :
लोकशाही दिनामध्ये आतापर्यंत आलेल्या 357 प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून उत्तरे द्या असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशही दिन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झला. या लोकशाही दिनादिवशी नव्याने 88 अर्ज दाखल झाले.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांना सेवा वेळेत देण्यासाठी मोहिम राबवून कामे करा असे निर्देश दिले. या लोकशाही दिनात दाखल एकुण 88 अर्जापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 21, जिल्हा परिषद 9, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय 13 व इतर कार्यालये 45 असे अर्ज होते. या लोकशाही दिनाच्या वेळी यापुर्वी दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या 367 अर्जांवर आढावा घेण्यात आला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.