Satara : शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाईत तणाव, विकास शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी
वाई नगरपालिकेत प्रवीण शिंदे यांची अचानक माघार
वाई : वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवीण शिंदे यांनी अचानक घेतलेली माघार राजकीय क्षेत्रात खळबळ माजवून गेली. संपूर्ण दिवसभर बाई शहरात शिंदे शिवसेनेच्या माघारीची चर्चा सुरु होती. दरम्यान, पश्न विरोधी कारवाई केल्याबद्दल विकास शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी आपले वजन वापरून योगेश फाळके यांना डावलून स्वतःचा भाऊ प्रवीण शिंदे यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळवून एबी फॉर्मही आणला. त्यामुळे निवडणूक रिंगणात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत होती. मात्र, शिंदे गटाच्या प्रवीण शिंदे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत स्वपक्षीयांसोबत विरोधकांनाही एकप्रकारचा धक्का दिला. त्यामुळे पक्षाच्या सचिवांनी पक्ष विरोधी कारवाई म्हणून उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. विकास शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने पश्नाच्या कार्यपद्धतीचा वापर केल्याने शिंदे गटाला वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेल टाकता आले नाही. त्यावर विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाच्या वरिष्ठांना विश्वासात घेवूनच माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
तशी भूमिका पत्रकार परिषद घेवून विषद करणार असल्याचे तरुण भारताशी बोलताना सांगितले. प्रवीण शिंदे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षांने त्यांच्यावर कारवाई केली. तसाच प्रकार महाबळेश्वरमध्येही घडला आहे. त्या ठिकाणी कोणतीच कारवाई झालेली नाही, पक्षाने अशी एकतर्फी कारवाई का केली, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याचा कर्ता करविता कोण हे थोड्याच दिवसांत समोर येईलच, चुकीचे काम करून पक्षाची बदनामी करणाऱ्याला सोडणार नसल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले.