For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News : धार्मिक शब्दप्रयोगावरून मिरजमध्ये तणाव; जमावाकडून दगडफेक

12:29 PM Oct 08, 2025 IST | NEETA POTDAR
miraj news   धार्मिक शब्दप्रयोगावरून मिरजमध्ये तणाव  जमावाकडून दगडफेक
Advertisement

                                           मिरजमध्ये अपशब्दावरून तणाव निर्माण; तरुणाच्या घरावर दगडफेक

Advertisement

मिरज : धार्मिक भावना दुखावतील असा शब्दप्रयोग केल्याने शहरात मंगळवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संतप्त झालेल्या एका समाजाच्या जमावाने अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या तरुणांच्या घरावर दगडफेक करून मोठी नासधूस केली. याच संतप्त जमावाने काही दुकानावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य प्रमाणात लाठीमारही झाला.

दरम्यान अपशब्द वापरणाऱ्या संशयित तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत शहरात तणाबाचे वातावरण होते. शहरातील शास्त्री चौकात एका तरुणाने एका समाजाच्या काही तरुणांना धार्मिक भावना दुखावतील असा शब्दप्रयोग केला. यामुळे काही वेळातच मोठा जमाव जमा झाला. या जमावाने अपशब्द वापरणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली.

Advertisement

सदरचा प्रकार समजतात पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घरावर दगडफेक करण्याबरोबर संबंधित जमावाने शास्त्री चौक परिसरातील काही दुकाने आणि इतर घरावरील दगडफेक केली. यामुळे तणावात भरच पडली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य प्रमाणात लाठीमार केला.

यामुळे सर्वत्र पळापळ झाली आणि काही क्षणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अपशब्द वापरणाऱ्या तरुणावर कारवाई करावी यासाठी संबंधित समाजातील नागरिकांनी पोलीस ठाणे आवारात गर्दी केली होती. याचबरोबर शास्त्री चौकासह शहरातील काही अन्य चौकामध्येही लोक मोठ्या संख्येने घोळका करून उभे होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून एकत्र येत असलेल्या या समाजातील तरुणांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

अफवांवर विश्वास ठेवू नये : पोलीस प्रमुख संदीप घुगे

दरम्यान या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे अधिकाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरले. शास्त्री चौक आणि इतर ठिकाणी जमलेल्या जमावावर सौम्य लाठीमार करून पांगवले त्यानंतर प्रतिक्रिया देताना दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणाला धार्मिक स्वरूप देण्यात आल्याचे मत जिल्हा पोलीस प्रमुखांनी व्यक्त केले.

याबाबत स्वतः पोलीस प्रमुख घुगे यांनी व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये मंगळवारी घडलेली घटना ही दोन तरुणांमधील वाद होती. त्याला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मिरजेत किंवा बाहेर कोणीही घडलेल्या घटनेबद्दल उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याला मिळालेल्या माहितीची खातरजमा पोलिसांकडून करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान मिरज पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी मुख्यालयाकडे बदली केली आहे.

Advertisement
Tags :

.