महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर तणाव

06:23 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समर्थकांनी दोन हल्लेखोरांना पकडले, एकाला बेदम मारहाण; अनेक घरे जाळली

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्यातील जॉयनगरमध्ये काही हल्लेखोरांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. सैफुद्दीन लष्कर हे आपल्या घराबाहेर थांबलेले असताना काही हल्लेखोर तेथे पोहोचले आणि त्यांनी सैफुद्दीनची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर स्थानिकांनी एका कथित हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली.

मृत सैफुद्दीन लष्कर यांची पत्नी प्रधान आहे. त्याच्या हत्येमागे माकप समर्थकांचा हात असल्याचा आरोप स्थानिक टीएमसी नेत्यांनी केला. दरम्यान, या घटनेनंतर सैफुद्दीनच्या समर्थकांनी माकप कार्यकर्त्यांच्या घरांची तोडफोड केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अन्य काही घरांनाही आग लावल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माकपचे केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती यांनी समर्थकांवरील आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. कोणाचाही मृत्यू दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी योग्य तपास करून कटाचा उलगडा करावा, असे ते म्हणाले. सैफुद्दीन लष्करची हत्या ही तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. या घटनेसाठी माकपला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article