अहमदाबादमध्ये आजपासून टेनिस प्रीमियर लीग
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अहमदाबादमधील गुजरात युनिव्हर्सिटी टेनिस स्टेडियमवर 9 ते 14 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या बहुप्रतिक्षित टेनिस प्रीमियर लीगचा (टीपीएल) सातवा मोसम सुरू होत असून आठ संघ सदर स्पर्धेचे प्रतिष्ठित जेतेपद जिंकण्यासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत
लियांडर पेस, सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांच्यासह टेनिस दिग्गजांचा पाठिंबा लाभलेल्या या हंगामात प्रत्येक संघ 9 ते 13 डिसेंबरदरम्यान पाच लीग सामने खेळेल आणि 14 डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी शीर्ष चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि त्यानंतर अंतिम फेरी खेळविली जाईल. टीपीएलच्या प्रत्येक सामन्यात महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुऊष एकेरी आणि पुऊष दुहेरी अशा चार लढतींचा समावेश असेल. प्रत्येकी 25 गुणांसह प्रत्येक सामन्यामागे एकूण 100 गुण उपलब्ध असतील.
या मोसमात जगातील अव्वल 50 खेळाडूंतील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह भारताची उत्कृष्ट प्रतिभाही दिसेल. एसजी पायपर्सचे नेतृत्व भारताचा दोन वेळचा ग्रँड स्लॅम विजेता रोहन बोपण्णा करेल. त्याच्यासोबत भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला एकेरी खेळाडू श्रीवल्ली भामिदिपती आणि रामकुमार रामनाथन असतील. राजस्थान रेंजर्स जागतिक क्रमवारीत 26 व्या क्रमांकावर असलेला इटलीचा लुसियानो दरदेरी, रशियाची अनास्तासिया गासानोवा आणि दक्षिणेश्वर सुरेश यांच्यावर अवलंबून असेल.
गुरगाव ग्रँड स्लॅमर्स ब्रिटनच्या डॅनियल इव्हान्सच्या अनुभवावर अवलंबून असतील. तो भारताची अव्वल महिला एकेरी खेळाडू सहजा यमलापल्ली आणि श्रीराम बालाजीसोबत उतरेल. गुजरात पँथर्समध्ये फ्रान्सचा जागतिक क्रमवारीतील 42 व्या क्रमांकाचा खेळाडू अलेक्झांड्रे मुलर, इटलीचा नुरिया ब्राँकासियो आणि भारताचा अनिऊद्ध चंद्रशेखर यांचा समावेश आहे. गतविजेता हैदराबाद स्ट्रायकर्स सध्या 93 व्या क्रमांकावर असलेल्या स्पेनचा पेद्रो मार्टिनेझसोबत पुन्हा एकदा चषक जिंकण्याची आशा बाळगेल. त्याच्यासोबत फ्रान्सचा कॅरोल मोनेट असेल