महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून विविध कामांसाठी निविदा

06:32 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महसूल वाढीसाठी जोरदार प्रयत्न

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महसूल वाढविण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने खुल्या जागा, तसेच मागील अनेक वर्षांपासून वापराविना असलेल्या दुकान गाळ्यांसाठी निविदा मागविल्या आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कॅन्टोन्मेंटच्या महसुलात वाढ होणार आहे. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या तोडणे व स्क्रॅप उचलण्यासाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत.

कॅन्टोन्मेंटने पाच वर्षांसाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षांपासून मालमत्ता भाडेतत्त्वावर न दिल्याने त्या तशाच पडून होत्या. किमान थोडा तरी महसूल जमा होईल, या उद्देशाने निविदा मागविण्यात येत आहेत.

ओल्ड पोस्ट ऑफिस रोडवरील तात्पुरत्या स्वरुपात खुले मंगल कार्यालय, फिश मार्केट सेंट अँथनी शाळेमागे गॅरेज किंवा नर्सरीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबरोबरच कॅटल मार्केट येथे गॅरेज, बेवूर रोड येथे फूड कोर्ट किंवा पार्किंग, कॅन्टोन्मेंट जिम येथे नवीन व्यायामशाळा, किल्ला येथील रामकृष्ण मिशनसमोर नर्सरी यासह इतर भागामध्ये चहाचे स्टॉल, पानटपऱ्या उभारण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून जुने भाजी मार्केटचे दुकानगाळे पाडविले जात आहेत. दुकान गाळ्यांसाठी वापरलेले लोखंड व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा, तसेच कॅम्प परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूणच निविदा मागवून याद्वारे महसूल वाढविण्याचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डकडून केला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article