For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाशिवनगर स्मशानभूमीत दहा स्वच्छतागृहे महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते पूजन

10:07 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदाशिवनगर स्मशानभूमीत दहा स्वच्छतागृहे महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते पूजन
Advertisement

बेळगाव  : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये स्वच्छतागृह नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी वारंवार होत होती. त्यानुसार महानगरपालिकेने निधी मंजूर केला असून त्या कामाचे पूजन महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते झाले. या स्मशानभूमीमध्ये महिलांसाठी पाच व पुरुषांसाठी पाच अशी एकूण दहा स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. महापौर सविता कांबळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शंकर पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.