For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

करजगी येथे एका रात्रीत दहा घरे फोडली

09:19 PM Sep 16, 2022 IST | Abhijeet Khandekar
करजगी येथे एका रात्रीत दहा घरे फोडली

प्रतिनिधी/अक्कलकोट

Advertisement

करजगी ता.अक्कलकोट येथे गुरूवारी १५ संप्टेबर रोजी रात्री पावणेअकरा ते पहाटे साडेपाचच्या सुमारास पाच घरे फोडून अज्ञात चोरट्याने २८ हजार चारशे रूपयाचा ऐवज चोरून नेला. तसेच अन्य पाच घरांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने एकूण दहा घरे फोडली आहेत. याबाबतची फिर्याद अशोक मल्लिकार्जून गुजा (वय ६६) यांनी दिली आहे.

फिर्यादी अशोक गुजा यांच्यासह करजगी गावातील सिध्दप्पा बिराजदार, महादेवी हलकट्टी, निलाबाई कलप्पा नागणसूरे, काशीनाथ सिध्दप्पा गौडगाव आणि इतर लोकांची घरे कडी कोयंडा उचकटून कुलूप तोडून चोरी केली. तसेच काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. याची दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.

Advertisement

डोक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी फिर्यादी गुजा हे मुलीकडे गुलबर्गा येथे गेले होते. तेव्हा चोरट्याने संधी साधली. गुजा यांचे बंद घराच्या दरवाजाचा डीकोयंडा उचकटून कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट तोडून रोख रक्कम १८ हजार रूपये, चार हजार रूपये किंमतीचा १० तोळे चांदीचे लक्ष्मीचा मुखवटा, २४०० रूपयाच्या ३० ग्रँम वजनाच्या चांदीच्या छोट्या वाट्या, चार हजार रूपयाचे १० तोळे चांदीचे ताट असा एकूण २८ हजार ४०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.