For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार सतीश सैल यांना तात्पुरता दिलासा

11:43 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार सतीश सैल यांना तात्पुरता दिलासा
Advertisement

बेंगळूर : कारवारच्या बेलकेरी बंदरावरून बेकायदेशीरपणे लोहखनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत गुरुवारपर्यंत वाढविली आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणीसाठी व्यावसायिक डॉक्टरचे नाव सुचविण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी आमदार सतीश सैल यांना उच्च न्यायालयाने मंजूर केलेला अंतरिम वैद्यकीय जामीन बेंगळुरातील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने रद्द केला होता. या आदेशाला सतीश सैल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी न्यायमूर्ती एस. सुनीलदत्त यादव यांच्या एकसदस्यीय पीठासमोर या याचिकेवर सुनावणी करताना जामीन मुदत वाढविली.

Advertisement

Advertisement
Tags :

.