कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Tempo-Truck Accident : टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक, दोघेजण जागीच ठार

03:36 PM May 25, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

धडक इतकी भीषण होती की, टेम्पोमधील दोघे जागीच ठार झाले.

Advertisement

वळसंग : जत तालुक्यातील मुचंडीपासून दोन किलोमीटरवर जत विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी दहा वाजता छोटा टेम्पो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेम्पोतील दोघे जागीच ठार झाले. तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. महमद कुमसगी (वय २४ वर्ष रा. कोकटनुर, ता. सिंदगी, जि. बिजापूर) व दीपक अर्जुन बडर (वय २३, रा. पडनूर. ता. इंडी जि. विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या वाहनातील चालक बसवराज मुंजेनावर हा गंभीर जखमी आहे.

Advertisement

रेणुका ट्रान्सपोर्ट कंपनीचा टेम्पो महमद कुमसगी चालवत होता. तर मित्र दीपक बडर शेजारी बसला होता. ते जतकडून विजापूरकडे जात होते. ट्रक बेदाणा भरून विजापूरकडून तासगांवकडे निघाला होता. दरम्यान, मुचंडीपासून दोन किलोमीटरवर लिंग धाब्यानजीक ओव्हरटेक करताना लहान टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पोमधील दोघे जागीच ठार झाले.

ट्रक चालक बसवराज मुंजेनावर, (रा. विजापूर) याचेही ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यात बसवराज मुंजेनावर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे

Advertisement
Tags :
@accident##Sangli#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaaccident newssangli news
Next Article