नवरात्रोत्सवासाठी तालुक्यातील मंदिरे सज्ज
आजपासून नवरात्र उत्सव : विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन : अनेक मंदिरांमध्ये कीर्तन, प्रवचन, पारायणादी कार्यक्रम
वार्ताहर /किणये
सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध मंदिरांमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून गावकरी मंदिर परिसराची व मंदिरांची साफसफाई करताना दिसत आहेत. मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. या सणासाठी तालुक्यातील मंदिरे सज्ज झाली आहेत. तालुक्याच्या विविध गावातील मंदिरांमध्ये सोमवारी घटस्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये त्या त्या गावातील परंपरेनुसार पूजाविधी करण्यात येणार आहेत.
घटस्थापना करून पूजाविधी करून मंदिरांमध्ये ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहेत. या दस्त्राsत्सवात ही ज्योत अखंड तेवत ठेवण्यात येणार आहे. काही गावांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती, दिवसभर भजन, सायंकाळी प्रवचन, कीर्तन व जागर भजन असे कार्यक्रम होणार आहेत. बहुतांशी गावांमध्ये दुर्गामाता मूर्ती रविवारी सायंकाळीच आणण्यात आलेल्या आहेत. या दुर्गामाता मूर्तीचे सोमवारी पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आह. त्यानंतर नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत.तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या नवरात्रोत्सवात गावातील सर्व देवतांची पूजाअर्चा करण्यात येणार आहे. खंडी पूजन व सिमोलंघन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.