महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनप्रक्षोभानंतर देवस्थान बंदी अखेर मागे

07:30 AM Dec 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानंतर पर्येतील तणाव निवळला : चोर्ला-बेळगाव महामार्ग दुपारी खुला

Advertisement

प्रतिनिधी / वाळपई

Advertisement

पर्ये देवस्थान मंदिर बंद करणे व भागांमध्ये 144 कलम निर्देशित करणे, माजिक महाजन गटाच्या चार जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर या विरोधात शुक्रवारी उशिरा रात्रभर शेकडो सेवेकरी महाजनांनी जमाव करून जोरदार निदर्शने केली. यामुळे दबावाला बळी पडून सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेतला. दरम्यान, आज शनिवारी पोलिस बंदोबस्तात पारंपरिक सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये गावकर महाजन गट वगळता इतरांनी सहभाग घेतला. अजूनही पर्ये देवस्थानच्या सभोवताली उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री आंदोलनकर्त्यांनी रोखून धरलेला चोर्ला महामार्ग उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपला आदेश मागे घेतल्यानंतर खुला करण्यात आला.

पर्ये येथील साखळेश्वर देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही माजिक गटाच्या चार जणांनी पहाटे 5 वाजता पूजा केली होती. याला आक्षेप घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकर समाजाच्या महाजनांनी करत सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी निर्देशानुसार पाच जणांवर गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे  शनिवारी होणारा पारंपरिक सप्ताह व रविवारी होणाऱ्या गौळणकाल्यावरही बंदी घातली. यासाठी 144 कलम लावून 24 डिसेंबरपर्यंत देवस्थान बंद करण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, आदेशाला गावकर समाज वगळता इतरांनी जोरदार विरोध केला. याच्या विरोधात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पर्येत मोठ्या प्रमाणात भाविक व विविध महाजन गटाचे सभासद जमून निदर्शने केली. चोर्ला महामार्ग अडविला. जोपर्यंत सदर आदेश मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा दिला होता. यादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एका पोलिस उपनिरीक्षकासह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामुळे पोलिस व उपजिल्हाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये आदेश घेतला मागे

दरम्यान शनिवारी सकाळी सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. या बैठकीमध्ये माजिक गटाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी माजिक गटाने 144 कलम मागे घेणे, पाच जणांवरील गुन्हे मागे घेणे तसेच देवस्थान बंदीचा आदेश मागे घेणे अशा अटी ठेवल्या. त्या सर्व अटी मान्य करण्यात आल्या. त्यानंतर नवीन आदेश देताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानावर घालण्यात आलेली बंदी मागे घेत असून 144 कलम हटविल्याचे आपल्या आदेशामध्ये स्पष्ट केले.

माजिक गटाने आपल्या अटी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. शनिवारी संध्याकाळी पारंपरिक सप्ताहमध्ये सर्वजण सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगितले. संबंधितांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सप्ताह कार्यक्रमात गावकर समाज वगळता इतरांनी सहभाग दर्शविला. यावेळी सुवासिनींनी देवीची ओटी भरली. त्यानंतर भजन, कीर्तन असे कार्यक्रम सादर करण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणाखाली :  उपधीक्षक जीवबा दळवी

शुक्रवारी रात्री आंदोलनकर्त्यांनी सांखळी -चोर्ला महामार्ग दगड, धोंडे घालून  अडविला होता. शनिवारी दुपारी उपजिल्हाधिकारी आदेश मागे घेतल्यानंतर महामार्ग खुला करण्यात आला, अशी माहिती उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. दरम्यान, देवस्थान परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घोळामुळेच तणाव : गावकर महाजनांचा आरोप

दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानंतर गावकर महाजन गट संतप्त बनला. समर्थकांनी दुपारी पुन्हा एकदा उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर पर्ये भागांमध्ये आज जी तणावाची व संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्याला उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा याच जबाबदार आहेत, असा आरोप गावकर महाजनांनी पत्रकारांसमोर केला. साखळेश्वर देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा सर्वांनी मिळून साजरा करावा असा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्याच्या प्रति शनिवारी दुपारी देण्यात आल्या. जर सदर आदेशाच्या प्रती शुक्रवारी सर्वांना मिळाल्या असत्या तर अशी वादाची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावा गावकर महाजन गटाने केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article