For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलुगू टायटन्सचा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश

06:17 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
तेलुगू टायटन्सचा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

2025 च्या प्रो कबड्डी लीग एलिमिनेटर 3 मध्ये तेलुगू टायटन्सने मंगळवारी 46-39 असा विजय मिळवत पटना पायरेट्सची स्वप्नवत धाव संपुष्टात आणली. भारत हुड्डच्या 23 गुणांच्या नेतृत्वाखाली टायटन्स आता अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सीझन 10 च्या विजेत्या पुणेरी पलटनशी सामना करेल.

दुसरीकडे, तरुण अयान लोहचबची आणखी एक अपवादात्मक कामगिरी होती. ज्याने एकाच हंगामात सहा सामन्यात 20+ गुण मिळवून स्वत:चा इतिहास रचला. तो एकाच हंगामात सहा सामन्यात 20+ गुण मिळवणारा पहिला पीकेएल रेडर बनला. त्याने हंगामाचा शेवट 316 रेड पॉइंट्ससह केला. जो पीकेएल 11 (184) मध्ये त्याने मिळविलेल्या गुणांपेक्षा 132 गुणांनी जास्त आहे. कारण त्याने एलिमिनेटर 3 पर्यंत पायरेट्सच्या आठ सामन्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही संघांच्या वेगवान सुरूवातीमुळे सुरूवातीलाच त्यांना गुणांची देवाणघेवाण झाली. अयानला त्याच्या पहिल्याच रेडमध्ये टॅकल करण्यात आले तर विजय मलिकला पुढच्याच चालीत थांबवण्यात आले.

Advertisement

तथापि, त्यानंतर लवकरच पायरेट्सनशे सुरूवातीचा ताबा घेतला. ज्याचे नेतृत्व दुसरे कोणीही नव्हते. तर अयान लोहचब यांनी केले. त्याने अंकित आणि प्रफुल्ल झावरे यांना स्पर्श करुन दोन गुणांची रेड मिळविली आणि त्यानंतर शुभम शिंदेलाही स्पर्श केला. टायटन्सचा कर्णधार विजयवर नवदीपने केलेल्या टॅकलने अवघ्या सहा मिनिटांत सामन्याचा पहिला ऑल आऊट केला. ऑल आऊटनंतर भरतने टायटन्सवर दबाव कायम ठेवला. बालाजी डी आणि दीपकवर दोन गुणांची रेड नोंदविली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस अंकित राणाने एका टच पॉइंटची भर घालून पायरेट्सची आघाडी चार गुणांपर्यंत वाढवली. ज्याचा गुणांक 13-9 होता.

Advertisement
Tags :

.