महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टेलिग्रामचे सीईओ डुरोव यांना अटक

06:06 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फ्रान्समध्ये कारवाई : क्रिमिनल कंटेंट रोखण्यास अपयश

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

इंस्टेंट मेसेजिंग आणि कम्युनिटी अॅप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना पॅरिसबाहेरील बॉर्गेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे. डुरोव  हे स्वत:च्या खासगी विमानाने तेथे पोहोचले हेते. पावेल विरोधात यापूर्वीच अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

पावेल विरोधात कंटेंट मॉडरेटशनमध्ये अपयशी ठरल्याचा आरोप आहे. यामुळे मेसेजिंग अॅपवर गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवण्याची अनुमती मिळाली होती. कंटेंट मॉडरेशन ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे आक्षेपार्ह आणि हानिकारक कंटेंट पाहणे आणि ती हटविण्याची प्रक्रिया आहे. ऑनलाइन सुरक्षेचा हा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. सध्या टेलिग्राम किंवा फ्रान्सच्या सरकारकडून यासंबंधी कुठलेच वक्तव्य समोर आलेले नाही. पाश्चिमात्य एनजीओ डुरोवच्या मुक्ततेची मागणी करणार का असा प्रश्न रशियाच्या विदेश मंत्रालयाने उपस्थित केला आहे.

इस्लामिक स्टेटकडून वापर

2015 च्या पॅरिस हल्ल्यांसाठी इस्लामिक स्टेटने स्वत:चे म्हणणे पोहोचविण्यासाठी टेलिग्रामचा वापर केला होता. याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता पावेल यांनी गोपनीयतेचा अधिकार हा दहशतवादासारख्या वाईट घटनांबद्दलच्या आमच्या भीतीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे उत्तर दिले होते. ऑक्टोबर 2015 पर्यंत इस्लामिक स्टेटच्या चॅनेलवर 9 हजारांपर्यंत फॉलोअर्स होते. नोव्हेंबर 2015 मध्ये टेलिग्रामने इस्लामिक स्टेटच्या प्रचार अन् प्रसारासाठी वापरण्यात येणाऱ्या 78 चॅनेल्सवर बंदी घातील होती.

रशियाचे रहिवासी असलेले पावेल दुरोव आणि त्यांचे बंधू निकोलाय दुरोव यांनी 2013 मध्ये टेलिग्राम सुरू केले होते. लाँचिंगच्या 11 वर्षांमध्ये टेलिग्राम या अॅपला 100 कोटीपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. भारत, इंडोनेशिया आणि रशियाच्या लोकांनी या अॅपला सर्वाधिक वेळा इन्स्टॉल केले आहे. 2022 मध्ये रशियासोबतच्या संघर्षानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी देशाला संबोधित करण्यासाठी टेलिग्रामचाच वापर केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article