For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर गुन्हेगारांना ‘दूरसंचार’चा दणका

06:30 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायबर गुन्हेगारांना ‘दूरसंचार’चा दणका
Advertisement

24 हजारहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक, डिजिटल ऑनलाईन फसवणुकीमुळे कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार विभागाने (डीओटी किंवा ‘डॉट’) तब्बल 24 हजार 228 मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत. सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाईन फसवणूक कायद्यांवरील कारवाईदरम्यान हे पाऊल उचलण्यात आल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. 24,000 हून अधिक मोबाईल कनेक्शन्स चुकीच्या ‘आयएमईआय’शी जोडले गेल्याचे वारंवार निदर्शनास आल्यामुळे सदर सिमकार्ड तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित दूरसंचार सेवा कंपन्यांना सदर सिमकार्ड क्रमांक ब्लॉक करण्याची सूचना केली आहे.

Advertisement

काही सतर्क नागरिकांनी दूरसंचार विभागाकडे केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारी मालकीच्या ऑनलाईन पोर्टलवर नागरिकांनी संशयित सायबर गुन्हेगारांविरोधात तक्रार केली होती. देशातील नागरिक saहम्प्arsatप्ग्.gदन्.ग्ह पोर्टलद्वारे तोतयागिरी किंवा सेवांचा गैरवापर करण्याबाबत आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. या पोर्टलवरील तक्रारींच्या अनुषंगाने दूरसंचार विभागाने तब्बल 10 हजार 834 संशयास्पद मोबाईल नंबर पुन्हा पडताळणीसाठी चिन्हांकित केले आहेत. याशिवाय सायबर गुन्ह्यांमध्ये आणि आर्थिक फसवणुकीमध्ये सामील असल्यामुळे 1.58 लाख आयएमईआय क्रमांक ब्लॉक केले आहेत. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या मोबाईल कनेक्शनवरही विभागाने बंदी घातली आहे.

Advertisement
Tags :

.