For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणा डीजीपी निलंबित

06:31 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणा डीजीपी निलंबित
Advertisement

तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पुष्पगुच्छ दिल्याने आयोगाची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

निवडणूक आयोगाने तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना निलंबित केले आहे. अंजनी कुमार यांनी आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. राज्यातील मतमोजणीनंतर सकाळच्या टेंडमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाल्यानंतर डीजीपी अंजनी कुमार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रे•ाr यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी रेवंत रे•ाr यांनी कोठूनही निवडणूक जिंकली नव्हती. याचदरम्यान डीजीपींनी रे•ाr यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे.

Advertisement

तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील विधानसभेच्या एकूण 119 जागांपैकी काँग्रेस 64 जागांवर विजयी झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव कामारे•ाr मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. त्यांचा भाजपच्या केव्ही रमणा यांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा रेवंत रे•ाrही याच जागेवरून निवडणूक लढवत होते. त्यांनाही येथून पराभवाचा धक्का बसला आहे. रेवंत रे•ाr कोडंगल आणि कामारे•ाr या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी कोडंगलमधील जागा जिंकली आहे.

Advertisement
Tags :

.