तेजस्विनीला वर्ल्ड कप नेमबाजीत सुवर्ण
वृत्तसंस्था/ सुहल, जर्मनी
अविस्मरणीय प्रदर्शन करताना भारताच्या तेजस्विनीने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजीत महिलांच्या 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे भारताने चीनला मागे टाकत पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले.
हरियाण्याच्या या 20 वर्षी नेमबाजाचे वर्ल्ड कपमधील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. भारताची एकूण 11 पदके झाली असून त्यातील हे तिसरे सुवर्णपदक आहे. याशिवाय भारताने 4 रौप्य व एक कांस्यपदक मिळविले आहे. चीननेही 3 सुवर्णपदके मिळविली आहेत. मात्र त्यांना एकच कांस्यपदक मिळविता आले आहे.
तेजस्विनीने या प्रकाराच्या अंतिम फेरीत 31 गुण नोंदवले तर त्रयस्थ नेमबाजाने 29 गुण घेत रौप्य व हंगेरीच्या मिरियम जाकोने 23 गुण घेत कांस्य मिळविले. तेजस्विनीने ग्रिडवर 24 व्या क्रमांकावर सुरुवात केली. 300 नेमबाजांच्या पात्रता फेरीत तिने 282 गुण नोंदवले होते. सोमवारी दुसऱ्या रॅपिड फायर फेरीत तिने 293 गुण नोंदवल्यानंतर तिचे एकूण 575 गुण झाले. त्यामुळे तिला एकंदर चौथे स्थान मिळाले. यात एकूण 50 नेमबाज आहेत. टॉप आठमध्ये स्थान मिळविणारी भारताच्या चारपैकी ती एकमेव नेमबाज आहे. रिया शिरीश थत्तेने अंतिम फेरीत 82 गुण नोंदवत एकूण 569 गुणांची कमाई केली. तिची अंतिम फेरी केवळ 4 गुणांनी हुकली तर मिरियमने आठवे स्थान मिळविले.
रॅपिड फायर अंतिम फेरीच्या 10 सिरीजमध्ये तेजस्विनीने चीनची झाओ टाओटाओ, तैपेईची चेंग येन चिंग, तिची सहकारी मिरियम व अॅलिना यांचे कडवे आव्हान मोडून काढत यश मिळविले. अन्य भारतीयांत नाम्या कपूरने 18, दिव्यांशीने 24 वे व रियाने 15 वे स्थान मिळविले. भारताने गेल्या पाच आयएसएसएफ ज्युनियर स्पर्धांत चार वेळा अव्वल स्थान मिळविले आहे.