तेजस्विन शंकरचा डेकॅथ्लॉनमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम
वृत्तसंस्था/ वॉर्सा, पोलंड
विस्लाव झापिएवस्की मेमोरियल 2025 अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजस्विन शंकरने दुसऱ्यांदा स्वताचा राष्ट्रीय डेकॅथ्लॉनचा विक्रम मोडत 7,826 गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. मात्र त्याला येथे चौथे स्थान मिळाले.
26 वर्षीय धावपटूने 2022 मध्ये हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक मिळवताना 7,666 गुणांच्या कामगिरीत सुधारणा करीत 2011 पासून असलेला भरतिंदर सिंगचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. या स्पर्धेमध्ये शंकर चौथ्या स्थानावर असल्याने, ओंद्रेज कोपेकीने विजेतेपद पटकावले आहे ज्याने 8,254 गुणांसह सर्वकालीन स्पर्धेचे रेकॉर्ड प्रस्थापित केला, त्यानंतर त्याचा देशबांधव विलेम स्ट्रास्की (8136) आणि एस्टोनियाचा रिस्टो लिलेमेट्स (8107) यांचा क्रमांक लागतो.
तेजस्विन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 4,292 गुणांसह आघाडीवर होता. पण दुसऱ्या दिवशी तो पिछाडीवर पडला. त्याने 1500 मीटर आणि 100 मीटर शर्यतींमध्ये अनुक्रमे 4:31.80 आणि 11.01 ची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील केली. ही स्पर्धा डेकॅथ्लॉनमध्ये युरोपियन भूमीवर त्याची पहिली मोठी कामगिरी होती. या वर्षाच्या सुरुवातीला, तेजस्विनने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकविले होते,