For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

लँड फॉर जॉब घोटाळा : ईडीकडून तेजस्वी यादवांची 8 तास चौकशी

12:43 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
लँड फॉर जॉब घोटाळा   ईडीकडून तेजस्वी यादवांची 8 तास चौकशी

 लालूप्रसाद यादव देखील आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली आहे. ही चौकशी सुमारे 8 तासापर्यंत चालली आहे. ईडीने तेजस्वी यादव यांना 19 जानेवारी रोजी समन्स बजावत 30 जानेवारी राजी पाटण्यातील कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. यापूर्वी सोमवारी ईडीने लालूप्रसादव यादव यांची सुमारे 10 तासांपर्यंत चौकशी केली होती.

Advertisement

तेजस्वी यादव यांना ईडीकडून जवळपास 40 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी झाली आहे. 2004 मध्ये लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. लालूप्रसादांच्या कार्यकाळादरम्यान रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून भूखंड प्राप्त करण्यात आले हेते.

Advertisement

अल्पवयीन असताना कोट्यावधी रुपये कमाविणारी कंपनी स्थापन करण्याची कल्पना कशी सुचली?  ही कंपनी कधी स्थापन झाली? या कंपनीच्या स्थापनेकरता तुम्ही काय-काय केले असे प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी तेजस्वी यांना विचारले आहेत.

कंपनी 4 कोटीची असताना काही वर्षांमध्येच या कंपनीत कोट्यावधींचे व्यवहार कसे होऊ लागले असा प्रश्नही तेजस्वी यांना विचारण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे उत्पन्न आणि खर्चाची माहिती देखील विचारली आहे.  कंपनी नेमके काय करते याविषयी अधिकाऱ्यांनी विस्तृतपणे चौकशी केली आहे.

तेजस्वी यादव यांची चौकशी सुरू असताना ईडीच्या कार्यालयाबाहेर राजद नेत्यांनी गर्दी केली होती. यात तेजस्वी यांची मोठी बहिण मीसा भारती, भाऊ तेजप्रताप यादव यांचाही समावेश होता.

Advertisement
Tags :
×

.