कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चालू महिन्यात मिळणार तेजस एमके-1ए

06:45 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) लवकरच स्वत:च्या नाशिक येथील प्रकल्पातून पहिले एलसीए तेजस एमके-1ए लढाऊ विमान भारतीय वायुदलाला सोपविण्याच्या तयारीत आहे. भारताच्या स्वदेशी संरक्षण कार्यक्रमात हे मोठे पाऊल ठरणार असून ते भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढविणार आहे. परंतु जीई एअरोस्पेस (अमेरिका) या कंपनीकडून इंजिन पुरवठ्यात विलंब झाल्याने या प्रकल्पाला फटका बसला होता.

Advertisement

एलसीए तेजस एमके1ए

हे विमान तेजस एमके-1 चे अत्याधुनिक वर्जन असून ते भारतीय वायुदलासाठी बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या स्वरुपात डिझाइन करण्यात आले आहे. हे मिग-21 सारख्या लढाऊ विमानांना बदलण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे.

वेग-मॅक 1.8 (जवळपास 2200 किलोमीटर/प्रतितास)

रेंज : 1850 किलोमीटर (इन-फ्लाइट रिफ्युलिंगसोबत अधिक)

वजन : 13,500 किलोग्रॅम (कमाल टेक-ऑफ वजन)

इंजिन : जीई एफ404-आयएन20 टर्बोफॅन, 85 केएन थ्रस्ट

शस्त्रास्त्रs : 7 हार्डपॉइंट, 23 मिमी जीएसएच-23 तोफ, अस्त्र बीव्हीआर क्षेपणास्त्र, ब्राह्मोस-एनजी आणि निर्देशित बॉम्ब

सेंसर : ईएल/एम-2052 एईएसए रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सुइट अन् स्वदेशी डाटा लिंक

किंमत : प्रति लढाऊ विमान 580 कोटी रुपये (कराराच्या आधारावर)

उत्पादन : एचएएलच्या बेंगळूर अन् नाशिक येथील प्रकल्पात एकूण 24 लढाऊ विमानांची दरवर्षी निर्मिती शक्य

बलस्थाने..

स्वदेशी तंत्रज्ञान : 65 टक्क्यांपेक्षा सुटे भाग भारतात निर्मित, एईएसए रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सुइटचा समावेश

बहुउद्देशीय : आकाशातून आकाशात, आकाशातून जमिनीवर मारा करण्यास सक्षम

कमी खर्च : एफ-35 (650-800 कोटी) अन् एसयू-57 (300-400 कोटी) पेक्षा स्वस्त

अत्याधुनिक सेंसर : इस्रायली ईएल/एम-2052 एईएसए रडार अन् स्वदेशी इलेक्ट्रॉनिक सुइटमुळे अत्याधुनिक स्वरुप

कमजोरी..

इंजिनवरील निर्भरता : जीई एफ404 इंजिन पुरवठ्यात विलंब

मर्यादित रेंज : एफ-47 (1850प्लस नॉटिकल मैल) आणि एसयू (3500 किमी) पेक्षा कमी

उत्पादन दर : विलंबामुळे वायुदलाच्या गरजा पूर्ण करण्याचे आव्हान

नाशिकमध्ये उत्पादन केंद्र

एचएएलने तेजस एमके-1ए च्या निर्मितीला वेग देण्यासाठी नाशिकमध्ये तिसरे उत्पादन केंद्र सुरू केले आहे. बेंगळूरमध्ये पूर्वीच दोन केंद्रे आहेत, जी दरवर्षी 16 लढाऊ विमाने निर्माण करू शकतात.

भारतासाठी महत्त्व

मिग-27, मिग-21 आणि जग्वार यासारखी जुनी लढाऊ विमाने ताफ्यातून निवृत्त होणार आहेत. तेजस एमके-1ए लढाऊ विमानांमुळे 31 स्क्वाड्रन्सची संख्या वाढवून 42 पर्यंत नेण्यास मदत होणार आहे. तेजसमध्ये 65 टक्के सुटे भाग स्वदशी आहेत, तसेच याच्या निर्मितीत 6300 हून अधिक भारतीय उद्योगांची भागीदारी असल्याने हा प्रकल्प आत्मनिर्भरतेचा प्रतीक ठरतो. तेजस एमके-2 आणि एएमसीए (पाचव्या पिढीचे) भारतीय वायुदलाला अधिक मजबुत करतील. तेजस एमके-1ए जून महिन्याच्या अखेरपर्यंत वायुदलाला प्राप्त होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article