महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तहसीलदारांची दोन महिन्यांपासून कार्यालयाकडे पाठ

06:45 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

द्वितीय दर्जा तहसीलदारांवर पदभार : कायमस्वरुपी तहसीलदार नियुक्तीची मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

तहसीलदार कार्यालयातील द्वितीय दर्जा साहाय्यक (एसडीए) रुद्रण्णा यडवण्णवर यांनी आत्महत्या केल्यानंतर चौकशीचा ससेमीरा लागलेले तहसीलदार बसवराज नागराळ हे गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा पदभार द्वितीय दर्जा तहसीलदार सुभाष असोदे यांच्याकडे सोपविण्यात आला असून दोन्ही पदांचे कामकाज पाहताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले द्वितीय दर्जा साहाय्यक रुद्रण्णा यडवण्णवर यांनी तहसीलदार बसवराज नागराळ यांच्या कक्षातच फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तहसीलदार, प्रथम दर्जा साहाय्यक आणि राजकीय नेत्याच्या नावे व्हाट्सअॅप ग्रुपवर मॅसेज टाकला होता. या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने संशयित फरारी झाले होते. खरे तर त्यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविला. पोलीस आयुक्तांनी सदर आत्महत्या प्रकरणाचा तपास खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांच्याकडून काढून घेत खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्याकडे सोपविला. या प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.

खडेबाजार एसीपीकडून चौकशी सुरू असल्याने चौकशीचा ससेमीरा लागलेले तहसीलदार बसवराज नागराळ दोन महिन्यांपासून कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. आत्महत्येची घटना घडल्यानंतर प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी प्रथम दर्जा तहसीलदारांचा पदभार द्वितीय दर्जा तहसीलदार सुभाष असोदे यांच्याकडे सोपविला आहे. तेव्हापासून असोदे हेच दोन्ही पदांचे कामकाज पहात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला असून ते दिवसभर कार्यालयात बसून रहात आहेत.

आज तहसीलदार नागराळ कार्यालयात येण्याची शक्यता

गेल्या दोन महिन्यांपासून तहसीलदार नागराळ अनुपस्थित असल्याने त्यांच्या जागी नूतन तहसीलदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 5 नोव्हेंबर रोजी आत्महत्येची घटना उघडकीस आली होती. या घटनेला दोन महिने होत आले आहेत. सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी तहसीलदार बसवराज नागराळ कार्यालयात येणार असल्याची चर्चा तहसीलदार कार्यालयात सुरू आहे. मात्र ते येणार की नाही हे मात्र पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article