टेक्नोचा स्लिम 5जी कर्व्हड स्मार्टफोन येणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
टेक्नो कंपनीचा सर्वात स्लिम कर्व्हड 5जी स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 80 हजार रुपये इतकी असणार असल्याची माहिती उपलब्ध होते आहे. सदरचा 5जी नवा स्मार्टफोन अमोलेड 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह येणार असून 50 मेगापिक्सलचा कॅमेरा यामध्ये देण्यात आलेला आहे. फोनची बॅटरी 5200 एमएएच इतकी असणार असून प्रीमियम स्मार्टफोन बाजाराचा विचार करता कंपनीचा सदरचा स्मार्टफोन हा सर्वात स्लिम (आकाराने बारीक) असणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. यामध्ये हँडसेटला कर्व्हड् डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
किती असणार जाडी
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवला जाणार असून त्याची किंमत साधारण 80 हजाराच्या आसपास असेल असेही म्हटले जात आहे. कधी दाखल होणार यासंबंधीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जाडी फक्त 5.95 मिलिमीटर इतकी राहणार असल्याचे समजते. या तुलनेमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 25 हा स्मार्टफोन सर्वात कमी जाडीचा म्हणजेच 5.85 मिलिमीटरचा असला तरी या स्मार्टफोनला कर्व्हड् डिस्प्ले मात्र नाही.
वैशिष्ठ्य
टेक्नोच्या नव्या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर कॅमेराही देण्यात आला आहे. स्टेनलेस स्टील आणि पुनर्वापरयुक्त अॅल्युमिनियम यांच्या सहाय्याने स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आलेली आहे.