कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्लाउडफ्लेयरमध्ये तांत्रिक बिघाड

07:00 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक्स, चॅटजीपीटी, जेमिनीसह शेकडो वेबसाइट्स ठप्प

Advertisement

वृत्तसंस्था/सॅन फ्रान्सिस्को

Advertisement

इंटरनेटवर मंगळवारी दुपारी अचानक अनेक लोकप्रिय वेबसाइट्स आणि अॅप्सनी काम करणे बंद केले. क्लाउडफ्लेयरमध्ये आलेल्या मोठ्या आउटेजमुळे ‘500 इरर’ किंवा ‘समथिंग वेंट रॉन्ग’ यासारखे संदेश दिसून आले. जगभरातील युजर्स एक्स, जेमिनी, पर्प्लेक्सिटी आणि अनेक अन्य प्लॅटफॉर्म्सवर लॉगिन किंवा कंटेट लोड करू शकले नाहीत. तांत्रिक बिघाडाची तपासणी करत आहोत. वाइडस्प्रेड 500 एरर येत असून क्लाउडफ्लेयर डॅशबोर्ड आणि एपीआय देखील नीटप्रकारे काम करत नाही. पूर्ण स्थिती समजून घेत समस्या दूर करण्यावर काम सुरू असल्याचे क्लाउडफ्लेयरने स्वत:च्या स्टेट्स पेजवर म्हटले आहे.

इंटरनेटवर आपण ज्या वेबसाइट्स पाहतो किंवा ज्या सेवांचा वापर करतो, त्यावर दिसणारा कंटेंट (फोटो, व्हिडिओ, फाइल्स किंवा टेक्स्ट) निवडक कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्सव्च्या सर्वरवर सेव राहतो. अशास्थितीत क्लाउडफ्लेयरच्या सर्वरमध्ये अनेक वेबसाइट्सशी निगडित कंटेंट आहे आणि हे प्रभावित झाल्यामुळे सर्व संबंधित वेबसाइट्स ठप्प झाल्या.

एक्स देखील डाउन

सर्वाधिक समस्या एलन मस्क यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या युजर्सना झाली. अॅप आणि वेबसाइट दोन्हविंर फीड ब्लँक दिसून येत असून समथिंग वेंट रॉन्ग किंवा पेज रिफ्रेश करण्याचा मेसेज येत आहे.

डाउनडिटेक्टरवरही प्रभा

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरमध्येही समसया येत आहेत. डाउनडिटेक्टर सुरू केल्यास क्लाउडफ्लेयर नेटवर्कचा ‘इंटरनल सर्वर इरर’ दिसून येत होता. तर चॅटजीपीटी आणि काही अन्य प्लॅटफॉर्म्सही डाउनस असल्याची पुष्टी ओपनएआयने दिली आहे. समस्या क्लाउडफ्लेयर आउटेजशी निगडित आहे की नाही याची चौकशी कंपनी करत असल्याचे समजते. डाउनडिटेक्टरनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 11,000 हून अधिक रिपोर्ट नोंद झाले आहेत. ओपनएआय आणि जेमिनी सारखे एआय प्लॅटफॉर्मच नव्हे तर पेरप्लेक्सिटी, ग्रिंडर आणि स्पॉटिफाय यासारखे काही अन्य लोकप्रिय प्लॅटफॉर्मही डाउन आहेत. लीग ऑफ लीजेंड्स, कॅनवा आणि लेटरबॉक्सडी सारखी काही अन्य साइट्स देखील डाउन दिसत होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article