'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी'चा टीझर प्रदर्शित
नववर्षात १ जानेवारीला चित्रपटगृहात
मुंबई
लेखक आणि दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांची आगामी कलाकृती 'मु. पो. बोबिंलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब'चा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' , 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी', 'नाच गं घुमा' अशा एक-से-एक हीट सिनेमांनंतर आता मु. पो. बोंबिलवाडी नवीन वर्षात १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी यांचे २४ वर्षांपूर्वी मु. पो. बोंबिलवाडी हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता तीच कथा रुपेरी पडद्यावर येत आहे.
परेश मोकाशी यांच्या तीन सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या आगामी सिनेमाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्या सिनेमाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. या सिनेमात हिटलरच्या मुख्य भूमिकेत 'प्रशांत दामले' दिसणार आहेत. यांसोबत वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत प्रेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितीका श्रोत्री, अद्वैत दादरकर अशी कलाकारांची मांदियाळी या सिनेमात पाहयला मिळणार आहे.