नर्गिस फाखरीच्या बहिणाला न्यूयॉर्क मध्ये अटक
मुंबई
बॉलीवुड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीला आलिया फाखरी हिला न्यूयॉर्कमध्ये एका खुनाच्या प्रकरणात अटक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिपोर्टनुसार, नर्गिस फक्री हीची बहिणी आलिया फक्री हिच्यावर एक्स-बॉयफ्रेंड आणि त्याची प्रियसी यांच्या खुनाचा आरोप आहे.
आलिया फाखरी हिला तिच्या एक्स- बॉयफ्रेंडसोबत पुन्हा नातेसंबंध जुळवायचे होते. पण एक्स-बॉयफ्रेण्ड एडवर्ड जॅकब्स याने मात्र नकार दिला होता. हा नकार पचवता न आल्यामुळे एडवर्ड आणि त्याची गर्लफ्रेंड एटीएनची हत्या केल्याचे आरोप आलियावर करण्यात आले आहेत. रागाच्याभरात आलिया हिने एडवर्डच्या घराला आग लावली आणि त्या आगीत एडवर्ड व एटिएन जळून मृत्यूमुखी पडल्याचे आरोप आहेत. यासंबंधीची अधिक चौकशी न्यूयॉर्क पोलिस करत आहेत, अशी माहिती पुढे आली.
नर्गिस फाखरीची आई यांनी न्यूयॉर्क डेली ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार,, आलिया निर्दोष असल्याचे म्हणले आहे. आलिया कोणाचाही जीव नाही घेऊ शकत. ती अशी व्यक्ती नाही आहे, मला नाही वाटत तिचा या प्रकरणाशी काही संबंध आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.