सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीझर लॉन्च
एक दिवसात २ कोटी व्ह्युज
मुंबई
बॉलीवूड भाईजान किंग खानचा बहुचर्चित सिकंदर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२५ च्या ईदनिमित्त हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च झाला आहे.
या टीझरमध्ये सलमान खान संजय नावाची भूमिका साकारत आहे. संजय हा अन्याय झालेल्यांना तारणारा आहे. या सिनेमात संजयला त्याच्या आजीकडून सिकंदर हे नाव मिळाले असते. सलमान खान तोंडी एक-से-एक डॉयलॉग्ज दिलेले आहेत. सलमानसोबतचं अभिनेत्री रश्मिका मंधाना सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन ए आर मुरुगुदास यांनी केलेले आहे. ए आर मुरुगुदास हे गजनी या सुपरहीट सिनेमाचेही दिग्दर्शक आहेत.
२०२३ नंतर सलमान ने पठाण, सिंघम अगेन, बेबी जॉन यांसारख्या सिनेमात कॅमिओ रोल केले आहेत. पण मुख्य भूमिकेत २०२३ च्या टायगर ३ नंतर आता सिकंदरमध्ये दिसणार आहे. सलमानचा पॅन्डमिकच्या आधी दबंग ३ हा हिट झालेला सिनेमा आहे. या सिनेमाने बऱ्यापैकी १५० कोटीचा बिझनेस केला होता.
सिंकदरचा टीझर रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २ कोटीहुन अधिक व्ह्युज मिळाले आहे. तर ४० हजारहून अधिक कंमेट्स मिळाल्या आहेत. आता सलमान खानचा बहुचर्चित सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पहावे लागेल.