For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अश्रुधुराच्या नळकांड्या; हवेत गोळीबार

03:52 PM Sep 05, 2025 IST | Radhika Patil
अश्रुधुराच्या नळकांड्या  हवेत गोळीबार
Advertisement

कराड :

Advertisement

कराड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची रंगत वाढत असतानाच पोलिसांनी बुधवारी दुपारी थरारक मॉकड्रिल करून नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना सज्जतेचा संदेश दिला. कराडच्या बुधवार पेठेत झालेले हे मॉकड्रिल पाहण्यासाठी कराडकरांची मोठी गर्दी झाली होती.

गुरूवारी सायंकाळी कराड शहरातून दोनशेहून अधिक पोलिसांच्या तुकड्या संचलन करत मिरवणूक मार्गावर दाखल झाल्या. शहर पोलीस ठाणे, दत्त चौक, बाजारपेठ, चावडी चौक, मंडई परिसरातून बुधवार पेठ असे संचलन झाले. यानंतर पोलिसांनी बुधवार पेठेत अचानक अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हवेत डमी गोळीबार करत जमावाला काबूत आणण्याचे प्रात्यक्षिक केले. धुरामुळे क्षणभर वातावरण तणावग्रस्त झाले.

Advertisement

मॉकड्रिल दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जचेही प्रात्यक्षिक केले. जमाव नियंत्रण पथक, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस, तसेच वाहतूक शाखेच्या तुकड्यांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांच्या शिस्तबद्ध हालचालींनी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्वत: या सरावाला उपस्थित होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकाराला वाव देणार नाही, असा ठाम संदेश पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिला. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी शिस्तबद्ध, ठाम आणि कर्तव्यनिष्ठ राहायचे आहे. नागरिकांचा विश्वास राखणे आणि त्यांना सुरक्षिततेची हमी देणे, हे आपले प्रमुख ध्येय आहे.

  • समाजकंटक आमच्या टार्गेटवर

जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कराडला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासन नागरिकांच्या व कराडकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज आहेत. या काळात काही समाजकंटक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

..

Advertisement
Tags :

.