महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टीम साऊदीचे कसोटी क्रिकेटला प्राधान्य

09:20 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सध्या क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद आणि अतिजलद प्रकारांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. पण क्रिकेटमधील कसोटी या प्रकाराला आपण पहिले स्थान देत असल्याचे प्रतिपादन न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि कसोटी कर्णधार टीम साऊदीने केले आहे.

Advertisement

न्यूझीलंड संघाचा 2024-25 क्रिकेट हंगामातील क्रिकेट कार्यक्रम भरगच्च आहे. या कालावधीत न्यूझीलंडचा संघ आशिया खंडामध्ये 6 कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी पहिली कसोटी अफगाण बरोबर 9 सप्टेंबरला भारतात होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यांची मालिका लंकेविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची मालिका भारतीय संघाबरोबर होणार आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतणार आहे. न्यूझीलंडमध्ये चालु वर्षाच्या अखेरीस इंग्लंड विरूद्ध तीन सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. या सर्व भरगच्च क्रिकेट कार्यक्रमासाठी न्यूझीलंड संघाने आतापासूनच सरावावर अधिक भर दिला आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंवर या भारगच्च कार्यक्रमामुळे अधिक ताण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आशिया खंडामध्ये खेळताना खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीला अनकुल ठरतात. त्यामुळे न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांची कसोटी राहिल. मी नेहमीच वनडे आणि टी-20 तुलनेत कसोटीवर अधिक प्रेम करतो. न्यूझीलंड संघाने आशियामध्ये होणाऱ्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी आपल्या संघात 5 फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article