कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुवाहाटीत टीम इंडियाचा ‘फ्लॉप शो’

06:58 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टीम इंडिया 201 धावांत ऑलआऊट, आता सामना वाचवण्याचे आव्हान : आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी 

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात फक्त 201 धावांवर ऑलआउट झाली. तिसऱ्या दिवस अखेरीस, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात बिनबाद 26 धावा करत संघाची आघाडी 314 धावांपर्यंत वाढवली आहे. सलामीवीर एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन नाबाद राहिले. विशेष म्हणजे, सामन्याच्या तिन्ही दिवशी आफ्रिकेचे वर्चस्व दिसून आले. तिसऱ्या दिवशी टीम इंडिया ऑलआउट झाली आणि पाहुण्या संघाला त्रिशतकी आघाडी मिळाली आहे. यामुळे आता भारतासमोर अखेरच्या दोन दिवसात सामना वाचवण्याचे आणि व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.

सोमवारी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, भारताने 9/0 धावांवर खेळ सुरू केला आणि तिसऱ्या सत्रात संघ 201 धावांवर ऑलआउट झाला. पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी मिळाली तथापि, संघाने फॉलोऑन लागू केला नाही. आफ्रिकेकडून फलंदाजीत कमालीचे योगदान दिल्यानंतर वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अवघ्या 48 धावांत 6 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वालने 58 आणि वॉशिंग्टन सुंदरने 48 धावा केल्या. संघाने 95 धावांत फक्त दोन विकेट्स गमावल्या होत्या, परंतु सलामीवीरांच्या विकेट्सनंतर, संघाने 122 धावांपर्यंत 7 विकेट्स गमावल्या. सुंदर आणि कुलदीप यादवने भारताला 200 धावांपर्यंत पोहोचवले.

टीम इंडियाचा फ्लॉप शो

तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात जैस्वाल आणि राहुलने डावाची सुरुवात केली.  या जोडीने 65 धावांची सलामी दिली. ही जोडी जमलेली असताना केएलला 22 धावांवर केशव महाराजने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर जैस्वालने आपली विकेट गमावली. विकेट गमावण्यापूर्वी त्याने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना सर्वाधिक 97 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावा फटकावल्या. त्याला हार्मरने बाद केले. जैस्वाल बाद झाल्यानंतर मात्र भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. यानंतर अवघ्या 27 धावांत टीम इंडियाने आपल्या 6 विकेट्स गमावल्या. साई सुदर्शन 15, ध्रुव जुरेल 0, कर्णधार ऋषभ पंत 7, नितीश कुमार रे•ाr 10 आणि रवींद्र जडेजा 6 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे भारताची 7 बाद 122 अशी झाली होती.

वॉशिंग्टन सुंदरची संयमी खेळी

या घसरगुंडीनंतर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने लाज राखली. या जोडीने आठव्या विकेटसाठी 72 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे भारताला 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या. मात्र वॉशिंग्टन आऊट होताच टीम इंडियाचा पहिला डाव संपला. वॉशिंग्टनने 92 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 48 धावा केल्या. तर कुलदीपने त्याला चांगली साथ देताना 3 चौकारासह 19 धावांचे योगदान दिले. बुमराह 5, सिराज 2 धावा करुन आऊट झाले. यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 83.5 षटकांत 201 धावांत संपला. जॅन्सनने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय, सिमॉन हार्मरने 3 तर केशव महाराजने 1 बळी घेतला.

आफ्रिकेकडे भक्कम आघाडी

टीम इंडियाचा डाव 201 धावांत संपल्यानंतर आफ्रिकेला पहिल्या डावात 288 धावांची आघाडी मिळाली. यानंतर आफ्रिकन कर्णधार टेंबा बावुमाने टीम इंडियावर फॉलोऑन लादला नाही आणि दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने 8 षटकांत बिनबाद 26 धावा केल्या होत्या. रिकेल्टन 13 तर मार्करम 12 धावांवर नाबाद राहिले. आफ्रिकन संघाकडे 314 धावांची आघाडी असून आज चौथ्या दिवशी आपली आघाडी पाचशेपर्यंत वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. असे झाल्यास भारतीय संघासमोर सामना वाचवण्याचे मोठे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव 489 आणि दुसरा डाव 8 षटकांत बिनबाद 26 (रिकेल्टन खेळत आहे 13, मार्करम खेळत आहे 12)

भारत पहिला डाव 83.5 षटकांत सर्वबाद 201 (यशस्वी जैस्वाल 58, केएल राहुल 22, साई सुदर्शन 15, ऋषभ पंत 7, ध्रुव जुरेल 0, रवींद्र जडेजा 6, नितीश कुमार रे•ाr 10, वॉशिंग्टन सुंदर 48, कुलदीप यादव 19, जॅन्सेन 6 बळी, हार्मर 3 तर महाराज 1 बळी).

 मार्करमचे 5 झेल अन अनोखा विक्रम

द.आफ्रिकेचा स्टार खेळाडू एडन मार्करमने अफलातून क्षेत्ररक्षण करताना 5 झेल घेतल्या. त्यातही त्याने घेतलेला एक झेल सर्वाधिक चर्चेत राहिला. मार्करमने घेतलेल्या 5 झेलांपैकी 3 झेल त्याने जॅन्सेनच्या गोलंदाजीवर घेतले. यामध्ये नितीश कुमार रे•ाrचा घेतलेल्या झेलचाही समावेश आहे. नितीश कुमार 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. तो रवींद्र जडेजाला साथ देत होता. पण 42 व्या षटकातील जॅन्सनने टाकलेल्या वेगवान चेंडूवर नितीश कुमारने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या अगदी टोकाला लागून मागे गेला. त्यावेळी दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्करमने त्याच्या उजव्या बाजूने सूर मारला आणि हवेतच एका हाताने झेल घेतला. मार्करमचा हा झेल पाहून अनेकांना थक्क केलं. नॉन स्ट्रायकरवर असलेला जडेजाही चकीत झाला होता.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात आत्तापर्यंत सर्वाधिक 5 झेल 16 वेळा घेण्यात आले आहेत. यात आता मार्करमही सामील झाला आहे. पण एकाच डावात 5 झेल घेणारा मार्करम आफ्रिकेचा मात्र दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी केवळ ग्रॅमी स्मिथने आफ्रिकेकडून एका डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 मध्ये 5 झेल घेतले होते.

जैस्वालचे 13 वे अर्धशतक

भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल यशस्वी फलंदाज ठरला. जैस्वालने 58 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 23 वर्षीय जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 व्या सामन्यापर्यंत 2498 धावा केल्या आहेत. या सामन्यात 50 धावांचा पल्ला गाठताच, जैस्वाल हा सचिननंतर दुसराच असा फलंदाज ठरला आहे. ज्याने 24 वर्षांचा होण्याआधी सर्वाधिक वेळेस 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो 21 व्या शतकातील पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने 23 वर्षांच्या वयापर्यंत 29 वेळा 50 हून धावा केल्या होत्या. या यादीमध्ये रामनरेश सारवान दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत, त्याने कसोटी कारकिर्दीत 25 वेळा 50 पेक्षा अधिक धावा काढण्याची किमया केली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी. अॅलिस्टर कुकने 23 वेळा, तर जावेद मियांदादने 22 वेळा ही कामगिरी बजावली केली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article