For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुवाहाटीत टीम इंडियाचे वस्त्रहरण

06:58 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुवाहाटीत टीम इंडियाचे वस्त्रहरण
Advertisement

कसोटीच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव : 25 वर्षानंतर जिंकली द.आफ्रिकेने मालिका 

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

पहिल्या कसोटीनंतर टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. गुवाहाटीतील बरसापरा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी 408 धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. याउलट, दक्षिण आफ्रिकन संघाने तब्बल 25 वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मालिकेत 17 बळी घेणाऱ्या सिमोर हार्मरला मालिकावीर तर मार्को जॅन्सेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

भारतात कसोटी मालिका जिंकत आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर केला, तर पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला. गुणतालिकेत भारतीय संघाची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताचा हा घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेतील दुसरी खराब कामगिरी ठरली. यापूर्वी न्यूझीलंडने त्यांना 3-0 असे नमवले होते.

भारतीय संघाचे वस्त्रहरण

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 489 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 201 धावाच करता आल्या. भारताचे फलंदाज नांगी टाकत असताना आफ्रिकेचा फिरकीपटू सेनुरन मुथूसामीने पहिल्या डावात 109 धावा केल्या, तर गोलंदाज मार्को जॅन्सेन (93) व काइल व्हेरेन (45) यांनीही दमदार फलंदाजी करून दाखवली. यानंतर जॅन्सेनने 6 विकेट्स घेताना भारताला 201 धावांवर गुंडाळले. जैस्वाल (58) वगळता इतर टीम इंडियाचे फलंदाज फ्लॉप ठरले. यानंतर आफ्रिकेने दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित करताना भारतासमोर विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ट्रिस्टन स्टब्स (94) शतक थोडक्यात हुकले, तर टॉनी डी झॉर्झी 49 धावांवर बाद झाला.

दुसऱ्या डावात भारताकडून चांगला प्रतिकार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, यशस्वी जैस्वाल (13) व लोकेश राहुल (6) हे स्वस्तात माघारी परतले. हार्मरने रचलेल्या सापळ्यात भारतीय फलंदाज अडकत गेले आणि निम्मा संघ 58 धावांवर तंबूत परतला. साई सुदर्शनने 139 चेंडू खेळताना 14 धावा केल्या. ध्रुव जुरेल (2) व कर्णधार पंत (14) हेही अपयशी ठरले. रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करून संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कोणाची साथ लाभली नाही. वॉशिंग्टन सुंदर 16 धावांवर बाद झाल्यानंतर नितीश कुमार रे•ाrकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण, हार्मरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारायला गेला अन् तिसऱ्या चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. ज•t 87 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 54 धावांवर बाद झाला आणि भारताच्या आशाही संपुष्टात आल्या. भारतीय संघाचा डाव 63.5 षटकांत 140 धावांवर आटोपला. हार्मरने 6 विकेट्स घेतल्या आणि भारतात कसोटी मालिकेत सर्वाधिक 17 विकेट्सचा विक्रम त्याने नावावर केला. त्याने डेल स्टेन याचा 2008 मधील 15 विकेट्सचा विक्रम मोडला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव 489 आणि दुसरा डाव 5 बाद 260 घोषित

भारत पहिला डाव 201 आणि दुसरा डाव सर्वबाद 140 (यशस्वी जैस्वाल 13, साई सुदर्शन 14, ऋषभ पंत 13, रवींद्र जडेजा 54, वॉशिंग्टन सुंदर 16, हार्मर 37 धावांत 6 बळी, केशव महाराज 2 बळी, मुथ्थुस्वामी आणि जॅन्सेन प्रत्येकी 1 बळी).

टीम इंडियाचा कसोटीत सर्वात मोठा पराभव

दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा धुव्वा उडवला आहे. आफ्रिकेने हा सामना 408 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, भारताला आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 400 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. याआधी 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला नागपूरच्या मैदानात 342 धावांनी पराभूत केल्याचा रेकॉर्ड होता.

भारताचे कसोटीतील सर्वात मोठे पराभव

  1. 408 धावा वि द.आफ्रिका, 2025
  2. 342 धावा वि ऑस्ट्रेलिया, 2004
  3. 341 धावा वि पाकिस्तान, 2006
  4. 337 धावा वि ऑस्ट्रेलिया, 2007

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकही भारताच्या पुढे

भारतातील पराभवामुळे sंऊण् पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला फायदा झाला आहे. दुसरी कसोटी हरल्यानंतर भारताची पॉइंट्स टक्केवारी 48.14 वर घसरली आहे, ज्यामुळे पाक संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. गुवाहाटी कसोटी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची विजय टक्केवारी 75 झाली असून त्यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया 4 पैकी 4 सामने जिंकून अद्याप अव्वल स्थानावर कायम आहे. दरम्यान, सध्याच्या चक्रात भारताचे अजून 9 सामने बाकी आहेत. अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट करण्यासाठी भारताने उर्वरित 9 पैकी किमान 8 सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. असे झाल्यास भारताची पॉइंट्स टक्केवारी 70 च्या वर जाईल आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता असेल.

द.आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिकाविजय

दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत करत मालिका 2-0 अशी आपल्या नावे केली. याआधी आफ्रिकेने 2000 मध्ये भारतात 2-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती आणि त्यानंतर 25 वर्षांनी त्यांनी भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन संघाने भारतीय संघाला 2-0 असे पराभूत केले होते. त्यानंतर आतापर्यंत एकदाही आफ्रिकेला भारतीय मैदानात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. अपराजित कर्णधार असा टॅग असलेल्या टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील 25 वर्षांचा दुष्काळ संपवत आफ्रिकेने मालिका विजयाचा पराक्रम करुन दाखवला.

आपल्याला संघ म्हणून चांगले प्रदर्शन करण्याची आवश्यकता होती, पण ही संधी आम्ही दवडली. आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे श्रेय हिरावून घेता कामा नये; त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगले खेळ केला. एक संघ म्हणून चिकाटीने, सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. या पराभवातून शिकले पाहिजे आणि भविष्यात चांगले प्रदर्शन केले पाहिजे.

ऋषभ पंत, भारतीय कर्णधार

भारतीय संघाला मायदेशात 2-0ने हरवणे सोपे नाही. सध्या आमच्या संघाचा सुवर्णकाळ सुरू आहे. हा मालिका विजय खूपच अभिमानास्पद आहे. आमच्यावर केलेल्या टीकेला आणि प्रश्नांना हे उत्तर आहे. संघ म्हणून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आता तो वाढतच जाईल.

टेंबा बावुमा, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईल : गौतम गंभीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या आणि अंतिम शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला 408 धावांनी पराभव पत्करल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गंभीरवर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. या पराभवानंतर गंभीरने पत्रकार परिषदेत आपल्या भूमिकेवर भाष्य केले. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने जबाबदारी स्वीकारली. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी खालावली आहे. गंभीरने गुवाहाटी पत्रकार परिषदेत अनेक कठीण प्रश्नांना शांतपणे उत्तरे दिली.

तुम्ही कसोटी संघासाठी योग्य प्रशिक्षक आहात का, यावर बोलताना तो म्हणाला, हे बीसीसीआयने ठरवायचे आहे. मी जेव्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता, तेव्हा मी म्हटले होते की, ‘भारतीय क्रिकेट महत्त्वाचे आहे, मी नाही आणि मी आजही तेच म्हणत असल्याचे त्याने यावेळी नमूद केले.

लोक हे सतत विसरतात. मी तोच माणूस आहे ज्याने इंग्लंडमध्ये एका तरुण संघाला मार्गदर्शन केले होते आणि ती मालिका अनिर्णीत राहिली. मी तोच माणूस आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे. हा संघ कमी अनुभवी आहे. आणि मी हे आधीही म्हटले आहे की, त्यांना शिकत राहावे लागेल आणि परिस्थिती बदलण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील असे गंभीरने यावेळी नमूद केले.

न्यूझीलंडविरुद्ध पराभवाची तुलना करु नका

यंदाच्या वर्षी घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध जो पराभव झाला त्या पराभवाशी आफ्रिके विरुद्ध पराभवाची तुलना करू नका. तो संघ आणि आताचा संघ यात जमीन आसमानचा फरक आहे. सध्याच्या संघात बॅटिंग ऑर्डरसह बॉलिंगमध्येही पूर्णपणे बदल झाला आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हते. त्यामुळे कसोटी संघाकडून अपेक्षित कामगिरीसाठी थोडा वेळ द्यावाच लागेल, असेही तो यावेळी म्हणाला.

Advertisement
Tags :

.