कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टीम इंडियाचा फक्त 27 चेंडूत विजय

06:59 AM Sep 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युएईवर 9 विकेट्स आणि 93 चेंडू राखून विजय : सामनावीर कुलदीप यादवचा विकेट्सचा चौकार, शिवम दुबेचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषक टी-20 स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताने युएईचा 9 विकेट्स आणि 93 चेंडू राखून विजय मिळवला. कुलदीप यादव आणि शिवम दुबेच्या फिरकीसमोर युएईचा डाव अवघ्या 57 धावांत आटोपला. यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य अवघ्या 27 चेंडूत आणि 1 गडी गमावत पूर्ण केले. आता, भारतीय संघाची पुढील लढत दि. 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.

बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या युएईकडून अलिशान शराफू आणि कर्णधार मोहम्मद वसीम यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या तीन षटकात काही आक्रमक शॉट्स खेळले. पण अखेर चौथ्या षटकात शराफूला जसप्रीत बुमराहने 22 धावांवरच त्रिफळाचीत केले. मोहम्मद वसीमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याआधीच कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात यूएईला नाचवले. वसीमने 19 धावांचे योगदान दिले. यानंतर कुलदीपने  एकामागून एक गडी बाद करत यूएईचे कंबरडे मोडले. कुलदीपनंतर शिवम दुबेनेही गोलंदाजीमध्ये कहर केला. अखेर संपूर्ण यूएई संघ केवळ 57 धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने 4 बळी टिपले, तर शिवम दुबेने 3 गडी बाद केले.

टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात

युएईने विजयासाठी दिलेले 58 धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या 27 चेंडूत गाठले.  भारताकडून अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आक्रमक सुरूवात केली. अभिषेकने 16 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 30 धावांचे योगदान दिले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक झेलबाद झाला. शुभमन गिलने 9 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 20 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 7 धावा करत चौकारासह संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने विजयी लक्ष्य अवघ्या 4.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यातच पूर्ण करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. युएईकडून जुनैद सिद्दिकीने एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

युएई 13.1 षटकांत सर्वबाद 57 (अलिशान शराफू 22, मोहम्मद वसीम 19, राहुल चोप्रा 3, मोहम्मद झोएब 2, असिफ खान 2, हरिष कौशिक 2, कुलदीप यादव 7 धावांत 4 बळी, शिवम दुबे 4 धावांत 3 बळी, बुमराहृ, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी).

भारत 4.3 षटकांत 1 बाद 60 (अभिषेक शर्मा 16 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारासह 30, शुभमन गिल 9 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 20, सूर्यकुमार यादव नाबाद 7, जुनेद सिद्दीकी 1 बळी).

31 धावांत 10 विकेट्स

यूएईची पहिली विकेट 26 धावांवर पडली. पण यानंतर त्यांची जी घसरगुंडी सुरु झाली की, संघाने नंतरच्या 31 धावांत सर्व 10 विकेट गमावल्या. टी-20 सामन्यात यूएईला सर्वात कमी धावसंख्येत रोखणारा भारत पहिला हा देश बनला आहे. यापूर्वी, यूएईची टी-20 मध्ये सर्वात कमी धावसंख्या 62 धावा होती, जी त्यांनी 2024 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध केली होती. पण आता टी-20 क्रिकेटमध्ये युएईची 57 ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे.

भारताचा सर्वात मोठा विजय (चेंडूच्या बाबतीत)

टी-20 क्रिकेटमध्ये चेंडू बाकी असताना भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने दुबईमध्ये युएईविरुद्ध फक्त 27 चेंडूत (4.3 षटकात) लक्ष्य गाठले, म्हणजेच 93 चेंडू शिल्लक होते. यापूर्वी 2021 मध्ये भारताने दुबईमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 81 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये चेंडू शिल्लक असतानाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय होता. 2024 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडने अँटिग्वा येथे ओमानला फक्त 19 चेंडूत हरवले. तेव्हा 101 चेंडू शिल्लक होते.

चेंडूच्या बाबतीत सर्वात मोठे विजय

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article