For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ध्रुव जुरेलला टीम इंडियाचे तिकीट

06:49 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
ध्रुव जुरेलला टीम इंडियाचे तिकीट
Advertisement

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा : शार्दुल-इशानला वगळले, तीन यष्टीरक्षकांन संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिकेनंतर भारत व इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 25 जानेवारीपासून उभय संघामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होईल्. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेलची संघात वर्णी लागली आहे. याशिवाय, प्रथमच तीन यष्टीरक्षकांन स्थान देण्यात आले असून इशान किशनला मात्र संघाबाहेरच बसवण्यात आले आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर असेल. बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशिरा संघ जाहीर केला.

Advertisement

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात केएल राहुल, केएस भरत आणि ध्रुव जुरेल या तीन यष्टीरक्षक फलंदाजांना संधी दिली गेली आहे.  यातील ध्रुव याला पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले आहे. याशिवाय, श्रेयस अय्यरही संघाचा भाग असेल. अनुभवी रोहितकडे नेतृत्वाची धुरा कायम असून जसप्रीत बुमराह उपकर्णधार असणार आहे. याशिवाय, विराट कोहली चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करेल. याशिवाय, टीम इंडियात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार व आवेश खान वेगवान गोलंदाजाची धुरा संभाळतील. फिरकीची धुरा अक्षर पटेल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा व कुलदीप यादव यांच्यावर असेल.

पुजारा, रहाणे बाहेरच, शार्दुललाही वगळले

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या कसोटी स्पेशलिस्ट फलंदाजांना निवड समितीने बाहेरच बसवले आहे. रहाणे आणि पुजारा जोडीने अनेकदा संघासाठी मॅच विनरची भूमिकाही पार पाडली. पण यावेळी संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी अनुभवी फलंदाजांना संघातून वगळले आहे. याशिवाय, मोहम्मद शमी दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे. शमी दुखापतीतून अजून पूर्णपणे बरा झालेला नसल्यामुळे तो संघाचा भाग असणार नाही. त्याशिवाय शार्दूल ठाकूरला वगळण्यात आले आहे. शार्दूलला मागील काही दिवसांपासून प्रभावी कामगिरी करता आली नाही.

उत्तर प्रदेशच्या ध्रुव जुरेलला संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या 22 वर्षीय ध्रुव जुरेलला टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे. ध्रुव शेष भारत आणि अंडर 19 इंडिया अ संघाकडूनही खेळला आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील चांगली राहिली आहे. ध्रुवने 15 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये 790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, ध्रुव जुरेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना शानदार कामगिरी केली आहे. याचाच फायदा त्याला झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

पहिली कसोटी, भारत वि इंग्लंड - 25 ते 29 जानेवारी, हैदराबाद.

दुसरी कसोटी, भारत वि इंग्लंड - 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम.

Advertisement
Tags :

.