कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज

06:58 AM Oct 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकण्याची भारताला संधी : फॉलोऑननंतर विंडीज फलंदाजांची कमाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने 390 धावा उभ्या करून भारतासमोर 121 धावांचे टार्गेट दिले आहे. चौथ्या दिवशी विंडीज फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत टीम इंडियासमोर समाधानकारक लक्ष्य ठेवण्यात त्यांना यश आले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी 1 गडी गमावत 63 धावा केल्या आहेत. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला 58 धावांची गरज आहे. दिवसअखेरीस केएल राहुल 25 तर साई सुदर्शन 30 धावांवर खेळत होते.

वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी 2 बाद 173 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी जॉन कॅम्पबेल आणि शाय होप हे दोघे अर्धशतके करून नाबाद होते. या दोघांनी चौथ्या दिवशीही दमदार सुरुवात केली. यादरम्यान, कॅम्पबेलने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्याने 199 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 3 षटकारासह 115 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. या दोघांत 177 धावांची भागीदारी झाली. शतकवीर कॅम्पबेलला 64 व्या षटकात जडेजाने पायचीत केले.

शाय होपचाही शतकी धमाका

कॅम्पबेल बाद झाल्यानंतरही शाय होपला कर्णधार रोस्टन चेसकडून साथ मिळाली. या दोघांनीही 59 धावांची भागीदारी करत भारताची 270 धावांची आघाडी पार केली. यादरम्यान, शाय होपनेही शतक पूर्ण केले. पण शतकानंतर लगेचच होपला मोहम्मद सिराजने त्रिफळाचीत केले. होपने संयमी आणि शानदार खेळी साकारताना 214 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा करून माघारी परतला. त्यानंतर काही वेळ तेविन इमलाचने कर्णधार चेसला काही वेळ साथ दिली, पण त्याला फार काळ कुलदीप यादवने टिकू दिले नाही. त्याने इमलाचला 12 धावांवर पायचीत केले.

 

कुलदीप, बुमराहची भेदक गोलंदाजी

92 व्या षटकात कुलदीपने वेस्ट इंडिजला दुहेरी धक्के दिले. कर्णधार रोस्टन चेसला 40 धावांवर बाद केले, तर खॅरी पिअरला शून्यावरच माघारी धाडले. यानंतर पाठोपाठ जोमेल वॉरिकनला 3 धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले, तर अँडरसन फिलिपला 2 धावांवर बाद केले. पण या विकेट जात असताना सातव्या क्रमांकावर आलेला जस्टिन ग्रीव्ह्ज एक बाजू सांभळत होता. त्याला दुसऱ्या बाजूने शेवटी जेडन सिल्सची साथ मिळाली. या दोघांनी अफलातून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. अखेर त्यांची भागीदारी तोडण्यासाठी गिलने बुमराहला बोलावले. बुमराहने 119 व्या षटकात सिल्सला वॉशिंग्टन सुंदरच्या हातून झेलबाद करत अखेर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 118.5 षटकात 390 धावांत आटोपला. सिल्सने 32 धावांचे योगदान दिले तर ग्रीव्हज 85 चेंडूत 50 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान शेवटच्या विकेटसाठी झालेल्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने 120 धावांची आघाडी घेतली आणि भारतासमोर 121 धावांचे टार्गेट ठेवले. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजने दोन बळी मिळाले.

टीम इंडियासमोर 121 धावांचे टार्गेट

विंडीजने विजयासाठी दिलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला. 8 धावांवर त्याला वॉरिकनने बाद करत विंडीजला पहिले यश मिळवून दिले. पण नंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांनी डाव सावरताना चौथा दिवस संपेपर्यंत विकेट जाऊ दिली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 18 षटकांत 1 गडी गमावत 63 धावा केल्या होत्या. केएल राहुल 2 चौकारासह 25 तर साई सुदर्शन 5 चौकारासह 30 धावांवर खेळत होते. भारतीय संघाला अद्याप विजयासाठी 58 धावांची गरज आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजला 9 विकेट्स मिळवायच्या आहेत, जे अशक्यप्राय असे आहे. यामुळे पाचव्या दिवशी टीम इंडिया सामन्यासह वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका 2-0 जिंकणार हे जवळपास निश्चित आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 5 बाद 518 घोषित

वेस्ट इंडिज पहिला डाव सर्वबाद 248

वेस्ट इंडिज दुसरा डाव 118.5 षटकांत सर्वबाद 390 (जॉन कॅम्पबेल 115, शाय होप 103, रोस्टन चेस 40, जस्टीन ग्रेव्हज नाबाद 50, जेडन सील्स 32, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह प्रत्येकी 3 बळी, मोहम्मद सिराज 2 बळी, जडेजा आणि सुंदर प्रत्येकी 1 बळी)

भारत दुसरा डाव 18 षटकांत 1 बाद 63 (यशस्वी जैस्वाल 8, केएल राहुल खेळत आहे 25, साई सुदर्शन खेळत आहे 30, वॉरिकन 1 बळी).

 

मोहम्मद सिराजची विक्रमी कामगिरी

विंडीजविरुद्ध पहिल्या डावात एकमेव विकेट घेणाऱ्या सिराजने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेण्याची किमया केली. या कामगिरीसह तो यंदाच्या वर्षात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे.  त्याने झिम्बाब्वेच्या मुजरबानीला मागे टाकले आहे. मुजरबानीकडे आतापर्यंत 36 विकेट्स होत्या, तर सिराज आता 37 विकेट्सह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

2025 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

मोहम्मद सिराज - 37

ब्लेसिंग मुजरबानी - 36

मिचेल स्टार्क - 29

नॅथन लायन - 24

जोमेल वारिकन - 23

जसप्रीत बुमराह - 22

 जडेजाची अशीही विक्रमी कामगिरी

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 1 बळी मिळवला. या विकेटमुळे तो आता भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने हरभजन सिंगला मागे टाकले आहे. जडेजाच्या आता भारतात 152 सामन्यात 377 आंतरराष्ट्रीय विकेट्स झाल्या आहेत. त्याने हरभजन सिंगचा (376 बळी) विक्रम मागे टाकला आहे.

भारतासाठी मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज

476 विकेट्स - अनिल कुंबळे (204 डाव)

475 विकेट्स - आर अश्विन (193 डाव)

377 विकेट्स - रवींद्र जडेजा (199 डाव)

376 विकेट्स - हरभजन सिंग (199 डाव)

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article